पोलीस अधिक्षक राठोडांची याचिका मॅटने फेटाळली. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

पोलीस अधिक्षक राठोडांची याचिका मॅटने फेटाळली.

 पोलीस अधिक्षक राठोडांची याचिका मॅटने फेटाळली.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी बदली विरोधात दाखल केलेली याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) फेटाळून लावली आहे. शासनाने राठोड यांची केलेली बदली योग्य व नियमाप्रमाणे असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
राठोड यांची नगरमधून बदली करण्यात आली होती. मात्र त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. यावर राठोड यांनी अ‍ॅड. किशोर जगदाळे यांच्या मार्फत मॅटकडे दाद मागितली होती. न्यायमूर्ती ए.पी. कुर्हेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. राठोड यांच्यावतीने अ‍ॅड. जगदाळे तर सरकारच्यावतीने अ‍ॅड. क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली. याचिका कर्त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाच्या तक्रारी असून त्यांची बदली करताना नियमित प्रक्रिया राबविण्यात आली असल्याचे नमूद करत न्यायालयाने राठोड यांची याचिका फेटाळून लावली.

No comments:

Post a Comment