जनसंकल्प फौडेशनच्या शिबिरात 48 जणांचे रक्तदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

जनसंकल्प फौडेशनच्या शिबिरात 48 जणांचे रक्तदान

 जनसंकल्प फौडेशनच्या शिबिरात 48 जणांचे रक्तदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः ’रक्तदान करु या एक पुण्यकर्म करु या’ या विचाराने रक्तदान होणे गरजेचे आहे. आज रक्तदानाची गरज असतांना जनसंकल्प फौंडेशनच्या कार्याकर्त्यांनी या उपक्रमातून समाजातील महत्वाचा विषय हाती घेतला आहे. एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करणे गरजेचे आहे. अशा उपक्रमातून युवकांमध्ये सामाजिकतेची भावना निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन श्रीगोंदा पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश्वर देशमुख यांनी केले.
कामठी गावात जनसंकल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, सावली फाऊंडेशन, शिवतेज युवा प्रतिष्ठानच्यावतीने  जनसंकल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष गणेश कांबळे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 48 रक्तदात्यांनी रक्तदान केले.  यावेळी श्रीगोंदा पंचायती समितीचे उपसभापती सिद्धेश्वराव देशमुख, प्रमुख पाहुणे म्हणून जनसंकल्प फौंडेशनचे अध्यक्ष महेश भोर, नागर फौंडेशनचे रवी गोरे, देविदास चेमटे, विठ्ठल आरडे, शिवाजी खेडकें, विठ्ठल शिंदे, राजेंद्र घोडके, आप्पासाहेब टाकले, सुभाष कांबळे, देविदास तोरडे आदि  उपस्थित होते.
रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. रक्तदानासाठी आलेल्या रक्तदात्यांना  सावली फाउंडेशन तर्फे गुलाबाचे झाड भेट म्हणून देण्यात आले व वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी  जनसंकल्प फाउंडेशन, सावली फाउंडेशन, शिवतेज ग्रुप चे सर्व पदाधिकार्यांने परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment