कोविड काळातील मे महिन्यातील शिक्षकांची ड्युटी अर्जित रजेत रूपांतरीत करा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

कोविड काळातील मे महिन्यातील शिक्षकांची ड्युटी अर्जित रजेत रूपांतरीत करा

 कोविड काळातील मे महिन्यातील शिक्षकांची ड्युटी अर्जित रजेत रूपांतरीत करा

शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः गेली वर्षभर शिक्षक ऑनलाईन शिक्षण आणि कोविड ड्युटी अशी जबाबदारी पार पाडत आहेत. मे महिन्याच्या सुट्टी काळातही राज्यभर अनेक शिक्षक, कर्मचारी यांनी कोविडड्युटी केलेली आहे. सुट्टी काळात कोविड ड्युटी आणि इतर अत्यावश्यक सेवेत आपले कर्तव्य बजावलेल्या शिक्षक, कर्मचारी यांना मे महिन्याचा पूर्ण वाहनभत्ता मिळाला पाहिजे. तसेच बुडालेली सुट्टी अर्जित रजेत रूपांतरित करून सर्विस बुकमध्ये जमा झाली पाहिजे, या मागणीचे पत्र आमदार कपिल पाटील राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिली असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव  सुनील गाडगे यांनी दिली.
वरील मागण्या आता जोर धरत आहेत. याबाबत शिक्षकांच्या भावना तीव्र आहेत.  सुट्टीकाळात कोविड ड्युटी केलेल्या शिक्षक, कर्मचार्‍यांना मे महिन्याचा पूर्ण
वाहनभत्ता देणेबाबत आणि बुडालेली सुट्टी अर्जित रजेत रूपांतरित करून सर्विस बुकमध्ये जमा करणेबाबत तातडीने आदेश व्हावेत, अशी मागणी शिक्षक नेते सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,  मोहमंद समी शेख. योगेश हराळे. जितेंद्र आरु , विजय कराळे ,  बाबासाहेब लोंढे, महेश पाडेकर, कैलास रहाणे महादेव डोंगरे  किशोर डोंगरे. संभाजी पवार,हनुमंत  रायकर ,सुदाम दिघे, संतोष देशमुख . महादेव कोठारे .राजेंद्र जाधव .सिकंदर शेख .प्रकाश मिंड संतोष शेंदुरकर किसन सोनवणे. नानासाहेब काटे. मुकुंद आंचवले. विलास माने. शरद कारंडे .राजेंद्र हिरवे. विलास वाघमोडे .प्रकाश तनपुरे .अनिल लोहकरे .बबनराव गायकवाड. नवनाथ घोरपडे. कैलास जाधव. गोरखनाथ गव्हाणे.. संजय भूसारी.शंकर भिवसने  महिला जिल्हाध्यक्ष आशा   मगर. महिला सचिव विभावरी रोकडे . कार्याध्यक्ष मिनाक्षी सूर्यवंशी. रोहिणी भोर शकुंतला वाळुंज, छाया लष्करे. जया गागरे. संध्या गावडे. अनघा सासवडकर, रेवन घंगाळे .जॉन सोनवणे आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment