हातवळण गावातील महिला दारूबंदीच्या विरोधात एकवटल्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

हातवळण गावातील महिला दारूबंदीच्या विरोधात एकवटल्या

 हातवळण गावातील महिला दारूबंदीच्या विरोधात एकवटल्या

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयात महिलांचे निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर तालुक्यातील हातवळन या गावातील महिला गावामध्ये दारूबंदी करण्यासाठी आता एकवटल्या आहेत. गावामध्ये सर्रासपणे उघड्यावर हातभट्टी दारूची विक्री सुरू आहे त्यामुळे अनेक गावातील पुरुष व्यसनाधीन झाले आहे व दारूच्या आहारी गेले आहेत.दररोज पुरुष दारू पिऊन येऊन पत्नीस व त्याच्या कुटुंबियांना दारूच्या नशेत मारहाण करतो त्यामुळे अनेक महिला या त्रासाला कंटाळल्या आहेत. या दारूच्या धंद्यामुळे अनेक कुटुंबीय उद्ध्वस्त झाले आहे.स्थानिक पोलिस प्रशासन या दारू विक्री कडे दुर्लक्ष करते.दारूच्या नशेत त्रास देणार्‍या नवर्‍याच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.गावातील सर्व महिला अवैद्य विक्री चालू असलेल्या दारू विक्रीला त्रस्त झाले आहे, महिलांना न्याय मिळत नसल्यामुळे या महिला हतबल झाले आहेत,त्रस्त झालेल्या महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली असून न्यायाची मागणी केली आहे.तसेच लवकरात लवकर गावात दारूबंदी करण्याची मागणी केले आहे. राज्य उत्पादन शुल्क कार्यालया मध्ये महिलांनी निवेदन दिले आहे यावेळी सविता वाघ,शोभा गायकवाड,दिपाली वाघ,सविता गायकवाड, मंदा वाघ, रंजनाबाई गांगुर्डे, मीना वाघ,आशाबाई बर्डे, अलका बर्डे,शालन माळी, मिराबाई बर्डे आधीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment