महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना अनुकंपा तत्वावर 5 कर्मचार्‍यांना नियुक्ती पत्र प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना अनुकंपा तत्वावर 5 कर्मचार्‍यांना नियुक्ती पत्र प्रदान

 महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना अनुकंपा तत्वावर 5 कर्मचार्‍यांना नियुक्ती पत्र प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचा-यांना अनुकंपा तत्वावर गट क मध्ये नेमणुक नियुक्ती पत्र 5 कर्मचा-यांना मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांचे शुभहस्ते देण्यात आले. यावेळी उपायुक्त डॉ.श्री.प्रदिप पठारे, आस्थापना प्रमुख श्री.अशोक साबळे, मा.श्री.संजय ढोणे, मा.श्री.सतिष शिंदे, श्री.प्रविण ढोणे, श्री.राजेश लयचेट्टी, श्री.किशोर कानडे, श्री.शुभम वाकळे आदी उपस्थित होते.
यावेळी मा.महापौर श्री बाबासाहेब वाकळे म्हणाले की, कर्मचा-यांचे अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केले होते. त्या प्रस्तावास गती देवून या कर्मचा-यांना मनपा सेवेत नियुक्तीचे पत्र देण्यात आले.    कर्मचा-यांनी आपल्या मनपाच्या नियमाप्रमाणे सेवेमध्ये प्रामाणिक काम करावे व मनपाचे हित जोपासावे तसेच नियमीत व वेळेत नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे. असे मा.महापौर श्री बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. यावेळी ओंकार ढोणे, राहुल सुर्यवंशी, अश्विनी शिंदे, संकेत आढाव, ओंकार रायपेल्ली या  कर्मचा-यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले.

No comments:

Post a Comment