आ.संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 17, 2021

आ.संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 आ.संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सण-उत्सव वाढदिवस साजरी करत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासणे गरजेचे आहे. संकट काळामध्ये मदतीचा हात देऊन आपले कर्तव्य पारा पडावे, दीनदुबळ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकट काळामध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी सक्षम पणे पार पाडावी, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याच सकारात्मक दृष्टिकोनातून आम्ही वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवीत असतो.आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त बूथ हॉस्पिटल व जिल्हा रुग्णालय येथे कोरोना बाधित रुग्णांसाठी आरोग्यदायी वस्तूंची भेट देण्यात आली तसेच अरुणोदय गोशाळा येथे चार याचे वाटप करण्यात आले शहरातील विविध मित्रपरिवाराने एकत्रित येऊन आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र परदेशी यांनी दिली.
यावेळी संजय सानप, निलेश खंडारे, किरण राका, किशोर हरबा, चंदन पवार, रोहित आहुजा, सागर मुर्तडकर, प्रमोद भिंगारे, उमेश झेंडे, गोपाल मालपाणी, प्रशांत कर्नावट, मनोज बलदोटा, अनिल सुराणा, प्रफुल्ल सुराणा, संतोष ठाकूर, रामेश्वर चव्हाण, चंदन पवार, गणेश पवार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment