झाडा मुळेच आपण आज जगत आहोत त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे - शहर प्रमुख दिलीप सातपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 14, 2021

झाडा मुळेच आपण आज जगत आहोत त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे - शहर प्रमुख दिलीप सातपुते

 झाडा मुळेच आपण आज जगत आहोत त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे - शहर प्रमुख दिलीप सातपुते


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ज्यावेळी या जगाची निर्मिती करण्यात आली त्यावेळी निसर्गामध्ये प्रमुख स्थान हे झाडांना दिले आहे त्यांच्यापासून आपल्याला जगण्यासाठी अनेक फायदे मिळतात. झाडा मुळेच आपण आज जगत आहोत त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन  शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरांमध्ये शिवसेनेच्या वतीने 5000 झाडे 20 फूट लावण्याच्या उपक्रमाला शुभारंभ करण्यात आला यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते नगरसेवक विजय पठारे अमोल येवले, सुनील सातपुते  सह शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी विजय पठारे म्हणाले वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे. याची जाण ठेवून प्रत्येकाने फक्त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही प्रयत्न करणं आवश्यक आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष वृक्ष हे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेले, निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान, एक जीवनछत्र, एक आधार-मानवी जीवन व वृक्ष यांच्यात एक अतूट नाते आहे. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा या ज्या तीन मूलभूत गरजा आहेत, त्यांची एकसमयावच्छेदे पूर्ती करणारे हे निसर्ग देणे. अनादी कालापासून मानवी जीवनाचा अविभाज्य अंग असलेले, मानवाच्या ऐहिक व आध्यात्मिक जीवनात सतत साथ देणारे, सर्वाग उपयोगी पडणारे/ उपयुक्त असणारे, स्थितप्रज्ञ योग्यासारखे. वनचरे व पक्षी यांनाही अन्न, वस्त्र, निवारा देणारे जाती, धर्म, वंश, लिंग, शत्रू-मित्र, गरीब- श्रीमंत, रोगी-निरोगी, साक्षर-निरक्षर, काळा-गोरा, खुजा-उंच इ.इ. कसलाही भेदभाव न करता सर्वाना समभावनेने अंगाखांद्यावर खेळवणारे, वृक्ष हे केवळ मानवच नव्हे, तर सर्व सजीवांचे जीवनदायी तत्त्व आहेत.
याप्रसंगी अमोल येवले म्हणाले. भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे वृक्षप्रेम अनादी कालापासून आहे, तसेच त्याचे संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. भारतीय सण, उत्सव आदींमधूनही वृक्षांना अधिष्ठान प्राप्त आहे. वृक्ष भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळवून आहेत.फार फार पुरातन काली वसुंधरेवर प्रचंड जंगले होती. घनदाट वृक्षरांजीने सर्व जग व्यापले होते, आणि कालांतराने भूपृष्ठावर भूकंपासारखे प्रचंड उत्पात होऊन ती महाकाय वृक्षरांजी जमिनीत खोलवर गाडली गेली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here