सीएसआरएफ फॉर्म व एनपीएसबाबत लेखी स्पष्टता द्यावी ः बोडखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

सीएसआरएफ फॉर्म व एनपीएसबाबत लेखी स्पष्टता द्यावी ः बोडखे

 सीएसआरएफ फॉर्म व एनपीएसबाबत लेखी स्पष्टता द्यावी ः बोडखे

योजनेच्या खात्यांचे अंतर्गत समस्या सोडविण्याची मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सीएसआरएफ फॉर्म व एनपीएस (राष्ट्रीय निवृत्ती वेतन) योजनेचे खात्यांचे अंतर्गत समस्या सोडवून आणि लेखी स्पष्टता देऊन संभ्रमावस्था दूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी शिक्षण आयुक्त व प्राथमिक शिक्षण संचालक यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे एनपीएस (राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना) खाते उघडण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात आली आहे. एनपीएस योजना तसेच डीसीपीएस योजने विरुद्ध सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा प्रचंड असंतोष व संभ्रम आहे. सदर असंतोष सर्व कर्मचार्यांनी संघटनेच्या विविध निवेदन व आंदोलनाद्वारे व्यक्त केला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
उपसचिव शालेय व शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडील दि. 28 जुलै 2020 चे संदर्भीय पत्रानुसार मुद्दा क्रमांक एक व दोन ची प्रथम कार्यवाई करावी, एनपीएस या योजनेत कर्मचारी सेवानिवृत्त किंवा मयत झाल्यास कोणता लाभ मिळणार?, एनपीएस योजना ही शेअर मार्केटवर आधारित असल्याने कर्मचारी वर्गाच्या रकमेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची राहील?, या योजनेतील मृत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंबियांना शासनाकडून कोणताही लाभ देण्यात आलेला नाही व यापुढे शासन या कर्मचार्यांना कुठला लाभ देणार?, एनपीएस, एनएसडीएल अनेक संस्थांच्या ऑनलाईन पेज वरती माहिती घेतली असता संस्थेने स्पष्ट म्हटले आहे की, या मधून रिटन मिळण्याबाबत ही संस्था कुठलीही हमी घेत नाही, असे नमूद आहे या प्रश्नाबाबत लेखी सुस्पष्टता द्यावी, तसेच 1 नोव्हेंबर 2005 पासून आजतागायत झालेल्या डीसीपीएस योजनेतील खात्याचे विवरण आर थ्री वार्षिक पद्धतीने शासन निर्णय दिनांक 7 जुलै 2017 मधील पद्धतीनुसार कर्मचार्यांना देण्यात यावे, ज्या कर्मचार्यांचे आजतागायत न झालेल्या किंवा अनियमित झालेल्या कपात, शासन अनुदान व व्याज जमा न झाल्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांनी स्विकारुन आर्थिक नुकसान भरून काढावे,  आंतरजिल्हा बदलीने बदली झालेले कर्मचारी व त्या कार्यालयातून दुसर्या कार्यालयात किंवा आस्थापनेत बदलून गेलेल्या कर्मचार्यांच्या मागील संचित रक्कम नवीन आस्थापनेला वर्ग झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या डीसीपीएस खात्यावरील हिशोबाबाबत अनियमितता आढळून आली असून सदरील समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. सीएसआरएफ व एनपीएस चे फॉर्म भरण्यास संघटनेची काही अडचण नसून, परंतु उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत लेखी स्पष्टता देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे खाते उघडण्याची संभ्रमावस्था दूर करण्याचे शिक्षक परिषदेने म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment