युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज - आ. नीलेश लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज - आ. नीलेश लंके

 युवकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज - आ. नीलेश लंके

आ.निलेश लंके प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोणाच्या महामारी मध्ये रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाचा औचित्य साधून  इगलप्राईड चाणक्य चौक या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. या रक्तदान शिबिरामध्ये 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींचे कोरोना लसीकरण होत आहे हि लस घेतल्यानंतर सुमारे 14 दिवस रक्तदान करता येत नसल्याने युवकांनी रक्तदान करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत या ठिकाणी शिवराज्याभिषेक दिना निमित्ताने विवाहित जोडप्यांनी रक्तदान करून विशेष म्हणजे प्रथम रक्तदान हे महिलांनी मोठ्या संख्येने केल्याचे या ठिकाणी पाहायला मिळाले या शिबिराला दर्पण ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले तर 153 बॉग इतके रक्तदान झाले आहे.
यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की शिवराज्याभिषेक दिन साजरा राज्य सरकारने शासकीय कारल्यावर गुढी उभारून केले तर येथे युवकांनी रक्तदान करून साजरा केला या रक्तदानातून अनेकांचे जीव वाचणार आणि युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान साठी पुढे यावे वो कोरोणाच्या संकटातून लवकरच बाहेर पडणार असल्याची भावना लंके यांनी व्यक्त केली यावेळी उपस्थित माजी सभापती अशोकराव झरेकर, रामदास आढागळे, सूनील कोकरे, भाऊसाहेब काळे, वैभव लंके, कालीदास भापकर, मोहन काळे,  सिद्धांत आंधळे, अरुण जाधव, सचिन कदम, राहुल वाघ, परशुराम गुंजाळ,  संभाजी पवार, सचिन कराळे, सतीश तांबे, राम सानप, सागर जाधव, सचिन गंगार्डे, अभिजीत भिल्ल,  रवी घनवटे, विशाल लवांडे, राम थोरात, अक्षय बांबरकर, अमित येवले, मुकुंद बोरकर, सागर भालसिंग आदी सह आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment