चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरला; गुन्हा दाखल! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरला; गुन्हा दाखल!

 चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरला; गुन्हा दाखल!

रात्री घराचा दरवाजा उघडा राहिला...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील बागरोजा हाडको मधील विनोद छगनराव काकडे वय 43 वर्षे या सिव्हील इंजिनियर कुटुंबाकडून दरवाज्याची कडी न लावल्यामुळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविली असून दरवाजास आतून कडी न लावणे महागात पडले आहे. किचन मधील लाकडी कपाटाचे ड्रॅावर मध्ये ठेवलेले खालील वर्णनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली असून यामध्ये 87,000/- रू किं ची सोन्याची गळयातील चैन, 12,000/- रू किं ची सोन्याची अंगठी, 38,000/- रू रोख रक्कम त्यामध्ये विविध दराचे नोटा असा एकूण 1,37,000/- रू ऐवज चोरीला गेला आहे. काकडे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
तोफखाना पोलिसांकडे देण्यात आलेल्या फिर्यादीत, काकडे यांनी म्हटले आहे की मी बागरोजा हाडको  या ठिकाणी आई- दीपदाबाई, पत्नी, स्वाती, मुलगा अभिषेक असे एकत्र राहत असुन मी सिव्हील इंजिनिअर म्हणून
काम करून माझ्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. माझे दोन मजली घर आहे. दिनांक 07 रोजी रात्री 10/30 वाजण्याच्या सुमारास आमचे घरातील सर्व लोकांचे जेवण झाले होते. त्यामुळे मी माझी पत्नी स्वाती व मुलगा अभिषेक असे वरच्या मजल्यावर माझ्या बेडरूम मध्ये झोपण्यासाठी गेले होतो व खाली मजल्यावर असलेले हॉल मध्ये माझी आई दीपदाबाई एकटी झोपली होती. मुलगा अभिषेक याची तबीयत खराब होती. त्यामुळे आम्ही 11 वा झोपी गेलो. त्यानंतर दिनांक 08 रोजी 04/45 वाचे सुमा मुलगा अभिषेक यास ताप असल्याने त्यास औषध देण्याकरीता मी बेडरूम मधुन खाली किचन मध्ये पाणी आण्यासाठी गेलो असता हॉल मध्ये माझी आई झोपलेली होती. तसेच मी किचन मध्ये गेलो असता माझे घरचे मागील बाजूस असलेला बाहेर जाण्याचा दरवाजा उघडा दिसला तेव्हा त्याच वेळी दिसले की, मागील बाजूस ठेवलेले लोखंडी कपाटाचे दारवाजे उघडे आहेत व त्यामधील समान अस्थाव्यस्थ खाली पडलेले होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, मागील दरवाजातून कोणीतरी आत प्रवेश करून सामानाची उचकापाचक केली आहे. तेव्हा मला समजले की, आईने चुकुन मागील बाजुचा दरवाजा बंद केला नव्हता. त्यानंतर मी बेडरूम मध्ये जावून पत्नीस उठवून तीस झालेला प्रकार सांगितला व आम्ही दोघे खाली किचन मध्ये येवून पाहणी केली असता मागील अंगणातील रूम मधील लोखंडी कपाट व किचन मध्ये ठेवले लाकडी कपाट उघडे दिसले. व त्याची उचकापाचकी केलेली दिसली तेव्हा आम्ही दोन्ही कपाटाची पाहणी केली असता सोने व रोख रक्कम कपाटातून चोरी गेल्याचे दिसून आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment