मोबाईल शॉपी फोडणारे 2 चोर गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

मोबाईल शॉपी फोडणारे 2 चोर गजाआड.

 मोबाईल शॉपी फोडणारे 2 चोर गजाआड.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..
10 मोबाईल, बजाज डिस्कव्हर सह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथील सलीम सांडू शेख याचे ‘सलीम मोबाईल शॉपी’ हे मोबाईलचे दुकान बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा काढून दुकानामधील 53 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरुन नेले होते. शेख यांनी नेवासा पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरणारे दोन आरोपीना 1 लाख 8 हजार 90 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून आरोपी नामे गणेश विठ्ठल आव्हाड, (वय- 23 वर्षे, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) आणि सलीम शौकत सय्यद, वय 23 वर्ष,रा. एमआयडीसी  याना अटक केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोनि/अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि/अनिल कटके यांना माहिती मिळाली कि, हा गुन्हा हा गणेश आव्हाड, रा. गजानन कॉलनी, अ.नगर याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोसई/गणेश इंगळे, सफी मन्सूर सय्यद, संतोष लोढे, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, मच्छिन्द्र बर्ड, प्रकाश वाघ, रविन्द्र घुंगासे, विजय धनेधर अशांनी मिळून एमआयडीसी, अहमदनगर परिसरात फिरुन मिळालेल्या माहितीनुसार
आरोपीचा शोध घेवून आरोपी गणेश विठ्ठल आव्हाड, वय- 23 वर्षे, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर, अ.नगर यास ताब्यात घेतले.
या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता प्रथम तो उडवाउडवीची उत्तरे देवून लागला. त्यानंतर अधिक विश्वासात घेवून गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता हा गुन्हा त्याने व त्याचा साथीदार नाम सलीम सय्यद, रा. तामसवाडी, ता. नेवासा, ह.रा. एमआयडीसी, अ.नगर असे दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिल्याने आरोपी सलीम शौकत सय्यद, वय 23 वर्ष, ह. रा. एमआयडीसी, अ.नगर यांस ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना गुन्ह्यातील चोरलेल्या मोबाईल बाबत विचारपूस केली असता आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेले 10 मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 53 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल काढून दिल्याने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज डिस्कव्हर मो.सा. नं. एमएच-20-डीए 6798 असा एकूण 1 लाख 8 हजार 90 रुपये किमतीच्या मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई  मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती दिपाली काळे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, सुदर्शन मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment