‘हिवरे बाजार’ सारखा गाव एक तपस्वीच करू शकतो ! अण्णा हजारेंनी सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळवून दिला! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

‘हिवरे बाजार’ सारखा गाव एक तपस्वीच करू शकतो ! अण्णा हजारेंनी सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळवून दिला!

‘हिवरे बाजार’ सारखा गाव एक तपस्वीच करू शकतो !
अण्णा हजारेंनी सर्वसामान्यांना माहितीचा अधिकार मिळवून दिला!

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी हिवरेबाजार, राळेगणसिद्धीचे केले कौतुक.नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः “हिवरे बाजार गाव दुष्काळमुक्त आहे. हिरवळीने नटलेले आहे. व्यसनमुक्त, विकासाभिमुख गाव जणू पृथ्वीवर स्वर्ग अवतरला, असा गाव एक तपस्वीच करू शकतो. हे पाहिल्यानंतर गावाला समृद्ध करणारे पोपटराव पवार यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेरणेतून गाव समृद्ध करण्यासाठी लाखो युवक तयार होतील” असे गौरवोद्गार व्यक्त करुन आ. सदाभाऊ खोत यांनी पोपटराव पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी खोत यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी खोत यांना गावात राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांची माहिती दिली. ग्रामस्थांतर्फे खोत यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. यावेळी एस. टी. पादीर, रो. ना. पादीर, ग्रामस्थ उपस्थित होते.
हिवरे बाजार (ता. नगर) येथे खोत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी गावची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सदाभाऊ खोत यांनी दूध दरवाढ, शेतकर्‍यांचे विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. खोत यांनी काल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची ही राळेगण सिद्धी येथे भेट घेतली. यावेळी ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून राज्याच्या कारभार हाकत आहे. प्रत्यक्षात काय सुरु आहे हे त्यांना दिसत नाही, असा टोला खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. त्याचबरोबर ठाकरे सरकारलाच कोरोनाची लागण झाली आहे आणि हे सरकार गेल्याशिवाय हा कोरोना बरा होणार नाही, सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेवून त्यांच्या तब्बेतीची विचारपुस केली. केंद्र सरकारचे कृषी विधेयक, पाणी आडवा पाणी जिरवा, जलसंधारण, शेतकर्‍यांचे राज्यातील विविध प्रश्न, सहकारी कारखाने इत्यादी विषयी चर्चा झाली. अण्णांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून राळेगणसिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. आण्णांनी जन आंदोलनाच्या माध्यमातुन माहितीच्या अधिकार सर्व सामान्यांना मिळवुन दिला. असे मत खोत यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment