नगर महापालिका प्रशासनाकडून ‘बायोवेस्टेज’ च्या नावाखाली लूटमार! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

नगर महापालिका प्रशासनाकडून ‘बायोवेस्टेज’ च्या नावाखाली लूटमार!

 नगर महापालिका प्रशासनाकडून ‘बायोवेस्टेज’ च्या नावाखाली लूटमार!

मनसेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील प्रत्येक हॉस्पिटलला मेडिकल वेस्टेज साठी महानगरपालिका प्रशासन पर किलोमागे 100 रु. आकारणी असून मेडिकल वेस्टेज वाहतुकीचा खर्च हा प्रत्येक हॉस्पिटल 500 रूपये प्रमाणे आहे म्हणजे एका हॉस्पिटलला दर महिना 15000 रूपये प्रमाणे वाहतूक खर्च म्हणजे नगर शहरात जवळ्पास 100 च्या वर कोविड सेंटर असून 1500000 लाख रूपये वाहतुकीचा खर्च हा महानगरपालिका, ठेकेदार गोळा करत असून कोरोना रुग्णांचे मेडिकल बायोवेस्टेजसाठी प्रत्येक हॉस्पिटलकडुन जवळपास हजारो रुपये दररोज महानगर पालिका गोळा करत असून महाराष्ट्रात फक्त अहमदनगर शहरातच अश्या प्रकारे खाजगी हॉस्पिटल कडून बायोवेस्टेजच्या नावाखाली अतिरीक्त शुल्क आकारणी सूरू आहे. खाजगी हॉस्पिटल वाले कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्ट च्या माध्यमातुन जवळ्पास हजारो रुपयांची आकारणी करून रुग्णांची लूटमार करीत असल्याचा आरोप मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केला आहे. याबाबत भुतारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे.
कोरोना महामारी मध्ये खाजगी हॉस्पिटल मध्ये गोरगरीब,सर्वसामान्य माणूस उपचार घेतांना सदर रुग्णांच्या नातेवाईकांचे अव्वाच्या सव्वा बिलानेआधीच त्रस्त असताना कंबरडे मोडले असताना महानगरपालिकेचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आला असून बायोवेस्टच्या नावाखाली खाजगी हॉस्पिटल कोरोना रूग्णांच्या बिलात प्रत्येक दिवस 1500 रुपये चार्ज आकारणी करतात त्याला सर्वस्वी महानगर पालिका जबाबदार असून मनपाची कोरोना रुग्णांच्या वेस्टेज मेडिकलची शुल्क आकारणी हि अतिरिक्त व लुटणार करणारी आहे.
कोरोना काळात राज्य सरकर रूग्णांना सवलत देत असताना अहमदनगर महानगरपालिका अश्या प्रकारे रुग्णांकडून लुटणार करीत असेल तर हा मोठा घोटाळा आहे. महानगरपालिका  घनकचरा उचलणार्‍या ठेकेदाराचे जर अश्या प्रकारे घर भरत असेल तर महानगरपालिकेच्या आरोग्य तसेच घनकचरा विभागात भ्रष्टाचाराचे पाणी मुरताना दिसत आहे. या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे सांगून भुतारे म्हणाले की, खाजगी हॉस्पिटल मध्ये ईतर आजारांवरील मेडिकल वेस्टेज आकारणी  व कोरोना मेडिकल वेस्टेज ची अतिरीक्त शुल्क आकारणी वेगळी वेगळी का आहे? खाजगी हॉस्पिटल मधील मेडिकल वेस्टेज गोळा करतानाच कोरोना आजारांचे मेडिकल वेस्टेज गोळा केले जाते मग वाहतुकीचे 500 रूपये कशासाठी आकारले जात आहेत? खाजगी हॉस्पिटल तसेच कोवीड सेंटर दररोज जवळ्पास 100 कोवीड सेंटरचे50000 हजार रूपये तूम्ही कोणत्या निकषांवर घेतले आहेत? कोरोना आजारांवरील रूग्णांचे मेडिकल वेस्टेजची  अतिरीक्त शुल्क आकारणी शासनाच्या नियमावली नुसार आहे का?, मेडिकल बायोवेस्ट नष्ट करण्यासाठी महानगरपालिका ठेकेदाराकडून प्रकल्पाची उभारणी केलेली आहे का? नसेल तर मेडिकल वेस्टेज ची अतिरीक्त शुल्क आकारणी योग्य आहे का?
असे अनेक प्रश्न मनसेचे नितीन भुतारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवुन केले असून याला सर्वस्वी महानगरपालिका आयुक्त, तसेच आरोग्य विभाग , घनकचरा विभाग जबाबदार असून संबंधित घनकचरा उचलणार्‍या ठेकेदाराला हे अधिकारि पाठीशी घालत आहेत व या ठेकेदाराचे घर भरण्याचे काम महानगरपालिका करत असून या सर्व प्रकरणावर आपण तातडीने कारवाई करुण कोरोना बायो वेस्टेज च्या अतिरीक्त शुल्क आकारणी रद्द करावी तसेच यापूर्वी अकरालेली रक्कम रुग्णांना त्यांच्या खात्यावर पुन्हा जमा करावी कोरोना काळात रुग्णांना मदत करण्याऐवजी मोफत सवलत देण्याऐवजी महानगरपालिका जर लुटमार करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. मुख्यमंत्री या नात्याने जर आपण या प्रकरणावर लवकर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठे जन आंदोलन या अहमदनगर शहरात उभारण्यात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here