आमदार लंकेंच्या कोविड सेंटरवर माहितीपट ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, June 27, 2021

आमदार लंकेंच्या कोविड सेंटरवर माहितीपट !

 आमदार लंकेंच्या कोविड सेंटरवर माहितीपट !

युवा दिग्दर्शक सुशील टकले व अर्चना चाटे  यांनी केली निर्मिती




नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी : 

सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले व मूळचे सोलापूरचे युवा अनुभवी दिग्दर्शक सुशील टकले व पारनेरच्या शिरापूर येथील अर्चना चाटे यांनी आमदार निलेश लंकेच्या  अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील भाळवणी कोरोना सेंटरवर माहितीपट तयार केला आहे. बॉलीवूडमधील दिग्गज कलाकारां सोबत जाहिरातीचे दिग्दर्शक म्हणून काम करणारे सुशील टकले यांनी अनुभवाच्या जोरावर एका आगळ्या वेगळ्या विषयाला हात घातला आहे. माणुसकीचा आशय असणारा हा लघुपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात आमदार नीलेश लंके यांनी केलेल्या कोरोना सेंटरचे काम त्यांनी बारकाईने पाहिले. त्यांच्या सोबतीला अर्चना चाटे या युवा दिग्दर्शिका यांनी संपूर्ण माहिती गोळा केली. त्यावर चर्चा झाली आणि ही सर्व मंडळी अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी पोहोचले. त्या ठिकाणी शरदचंद्र पवार कोरोना उपचार मंदिर हा फलक वाचून त्यांना आश्चर्य वाटले कोरोना सेंटर मंदिर नाव कसे ? मात्र आत गेल्यानंतर त्यांना तिथे काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवकांच्या कामाची जवळून माहिती घेता आली अन् या कामाची महती पटली. या सर्व गोष्टी माहितीपटात त्यांनी टिपल्या या कामाकरिता त्यांना आमदार निलेश लंके यांच्या सहकारी अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी  कोठावळे व पारनेर राष्ट्रवादी युवतीच्या माया रोकडे, फोटोग्राफर गणेश भापकर यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच अमोन चोपडे, चित्तरंजन धळ, यांनी हा माहितीपट निर्मितीसाठी परिश्रम घेतले आहेत. 


चौकट : 

गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही आमदार नीलेश लंके यांनी सुरु केलेल्या कोरोना उपचार केंद्रात चित्रीकरण केले. या दरम्यान आम्हाला कार्यकर्ते आणि स्वतः आमदार लंके कशा पद्धतीने काम करतात. हे  जवळून पाहायला मिळाले. या मंदिरातून १० हजारा पेक्षा जास्त लोक नीट होऊन घरी गेले आहेत. आणि विशेष म्हणजे एकाचाही मृत्यू झालेला नाही. अशा निरपेक्ष विषयावर काम करणे म्हणजे खूप समाधानाचे आहे. 


सुशील टकले/अर्चना चाटे, युवा दिग्दर्शक

No comments:

Post a Comment