राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, June 27, 2021

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती

 राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती

अहमदनगर राष्ट्रवादी युवतीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांची माहिती



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

देशाचे लोकनेते आदरणीय शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये युवती काँग्रेस जोमाने काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेली बावीस वर्षे काम करत आहे. राष्ट्रवादी पक्ष मध्ये सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्यासाठी वेगळ्यावेगळ्या सेलची स्थापना करण्यात आली आहे. आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वामध्ये युवती सेल स्थापन करण्यात आली. त्यामध्ये युवतींना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात.  युवतींना वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रोत्साहन दिले जाते. युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मधील राष्ट्रवादी युवती काँग्रेस आपले कार्य योग्य पद्धतीने पार पाडत आहे.

अहमदनगर पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब, मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार आशितोष काळे, आमदार किरण लहामटे,  जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा महिला अध्यक्ष मंजुषाताई गुंड, जिल्हा युवक अध्यक्ष कपिल पवार,  यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, पारनेर, अकोले, संगमनेर, नेवासा,  पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर ग्रामीण, या १४ तालुक्यातील पदांसाठी व जिल्ह्यातील युवती पदांसाठी  झूम मीटिंगद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत तरी राष्ट्रवादी युवती काँग्रेस मध्ये काम करण्यास इच्छुक असणारे युवतींनी  उपस्थित राहावे.   रविवार दिनांक २७ जून रोजी सायं ५ ते ७ या वेळेत अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या विविध युवती पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन झूम मीटिंग द्वारे निवडी करण्यात येणार आहे अशी माहिती अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या  जिल्हाध्यक्षा राजेश्वरीताई कोठावळे यांनी दिली. नाव नोंदणी व काही समस्या असेल तर खालील मोबाईल नंबर 72180 80886 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment