राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सन्मिता धापटे शिंदे यांचा सत्कार होणार ः नितीन भुतारे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सन्मिता धापटे शिंदे यांचा सत्कार होणार ः नितीन भुतारे

 राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सन्मिता धापटे शिंदे यांचा सत्कार होणार ः नितीन भुतारे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सूर नवा ध्यास नवा महाराष्ट्राची महा गायिका सुवर्ण कट्यार विजेत्या सन्मिता धापटे शिंदे हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सन्मिता धापटे शिंदे बोलतांना म्हणाल्या की सुर नवा ध्यास नवा च्या महाअंतिम सोहळ्या मध्ये राज साहेब ठाकरे यांचे वडील स्वर्गवासी श्रीकांत ठाकरे यांनी संगीत बध्द केलेले गाणे गाताना खुप आनंद वाटला माझ्यासाठी तो क्षण अविस्मरणीय प्रसंग होता. तसेच सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मनसेचे नितीन भुतारे यांनी बोलतांना सांगितले की सुर नवा ध्यास नवा महाराष्ट्रच्या विजेत्या सन्मिता धापटे शिंदे या अहमदनगर चे भूषण असून लवकच मुंबई येथे कृष्णकुंज निवस्थानी राज साहेब ठाकरे यांच्या हस्थे सन्मिता धापटे शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेन्द्र रशिनकर, व्याख्याते गणेश शिंदे, संकेत होसिंग, तसेच मनसेचे उशहराध्यक्ष्य गणेश शिंदे आदी. उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment