बारामती अ‍ॅग्रो तर्फे ऊर्जा उपक्रमांतर्गत एनर्जी ड्रिंक वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

बारामती अ‍ॅग्रो तर्फे ऊर्जा उपक्रमांतर्गत एनर्जी ड्रिंक वाटप

 बारामती अ‍ॅग्रो तर्फे ऊर्जा उपक्रमांतर्गत एनर्जी ड्रिंक वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राज्यासह देशावर संकट आले त्यावेळेस एक सामाजिक दातृत्वाची भावना समजून मदती द्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा बारामती ऍग्रो लिमिटेड आहे प्रत्येक संकटाच्या काळात बारामती ऍग्रो लिमिटेड ने सहकार्याची भूमिका बजावलेली आहे कोरोणाची दुसरी लाट सुरू असल्यानंतर च्या या कालावधीत रमाबाई आंबेडकर, संत सेवालाल, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, सुभेदार मल्हारराव होळकर, शहाजीराजे भोसले, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महाराणा प्रताप, संभाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती पार पडलया या थोर व्यक्तिमत्त्वांनी समाजासाठी कार्य करून राष्ट्रशक्ती ची ज्योत माणसांमध्ये पेटवली एक आदर्शवत ऊर्जा आपल्या प्रत्येकामध्ये या थोर व्यक्तिमत्त्वांनी निर्माण केलीत या महान व्यक्तिमत्वांची स्मरण म्हणून ऊर्जा हा उपक्रम बारामती ग्रो तर्फे राबविण्यात आला आहे.
या वैद्यकीय महा मारीत अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत तेव्हा त्यांच्या प्रती असणार्‍या आरोग्यविषयक काळजी व सद भावनेतूनच बारामती ग्रो तर्फे सामाजिक बांधिलकीतून ऊर्जा उपक्रमा अंतर्गत जिल्हा रुग्णालय येथे 1 हजार एनर्जी ड्रिंक व जिल्हा परिषद मध्ये 5 हजार 800 तर अहमदनगर महानगरपालिका मध्ये 1 हजार 700 व पोलीस अधीक्षक कार्यालय येथे 3 हजार 900 एनर्जी ड्रिंक येथील कार्यरत कोरोनायोद्धा साठी ओ.आर.एस एनर्जी ड्रिंक देण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते, युवक शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, वैभव खेंगट, प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, अशोक बाबर, किसनराव लोटके, फारुख रंगरेज, लहू कराळे, सुमित कुलकर्णी, कृष्णा सातपुते, रोहन साबळे आदी उपस्थित होते.                    
कोरोना योद्धाचा आरोग्याचा विचार करून त्यांना ओ.आर.एस एनर्जी ड्रिंक देण्यात आले व प्रतिकार शक्ती सुद्रुड राहावी या साठी हे एनर्जी ड्रिंक कोरोना योद्धाना देण्यात आले अहोरात्र कर्तव्य बजावणार्‍या  योद्धाचा शरीरातील डी हायड्रेशन रोखण्यासाठी या एनर्जी ड्रिंक परिणामकारक ठरणार असून बारामती ग्रो तर्फे ऊर्जा देण्याचा उद्देश केला आहे.

No comments:

Post a Comment