शिर्डी येथे घरोघरी जाऊन आरटीपीसीआर चाचण्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

शिर्डी येथे घरोघरी जाऊन आरटीपीसीआर चाचण्या

 शिर्डी येथे घरोघरी जाऊन आरटीपीसीआर चाचण्यानगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी -

राज्यात स्वच्छता तसेच 'माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शिर्डी नगरपंचायतच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये नगरपंचायतीचे पथक गेल्या आठ दिवसांपासून शहरात घरोघरी जाऊन आरटीपीसीआर तसेच रॅपीड ऑंटीजन चाचण्या करीत आहे. सद्यस्थितीत शहरात कोरोनाबाधितांची संख्या नगण्य आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शिर्डी शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दक्षता घेत शहरात वेळोवेळी हायपोक्लोराईडची फवारणी केली. सामाजिक नियम पाळण्याबाबत जनजागृती केली. तसेच गेल्या आठ दिवसांपासून नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक मोफत आरटीपीसीआर व रॅपीड चाचण्या करीत आहे. विविध भागातील उपनगरात सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत चाचण्या करीत आहे. दरम्यान, शिर्डी शहर कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असून खबरदारी म्हणून नगरपंचायत प्रशासन सतर्कता बाळगून आहे.

No comments:

Post a Comment