वारणवाडी येथे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

वारणवाडी येथे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन..!

 वारणवाडी येथे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन..!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर येथील वारणवाडी विविध विकास कामांचे भूमिपूजनाचा दिवशी जिल्हा परिषद बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी पंचायत समिती सभापती गणेशराव शेळके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. विकास कामांमध्ये १. जिल्हा परिषद १५ वा वित्त आयोग अंतर्गत सार्वजनिक शौचालय बांधणे रुपये ४ लक्ष, २. पंचायत समिती १५ वा वित्त आयोग अंतर्गत बंदिस्त गटार लाईन करणे रुपये चा ४ लक्ष , ३. ग्रामपंचायतीच्या १५ वा वित्त आयोग अंतर्गत बंदिस्त गटार करणे व पाणीपुरवठा लाईन करणे ६ लक्ष अशा एकूण १४ लक्ष रुपयांच्या कामांचा समावेश आहे. उद्घाटन करताना सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून या भागाचे नेतृत्व करताना या भागाला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही विकास कामे करण्यात कमी पडणार नाही माझ्या निवडणुकीत वारणवाडी ला पाणी योजना करून देण्याचे आश्वासन दिले होते ते माजी आमदार विजयराव औटी यांच्या माध्यमातून रुपये ३४ लक्ष निधी उपलब्ध करून पाणी योजना मार्गी लावली व त्याचे पाणी आज गावात आले आहे माझ्या महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला याचे निश्चित समाधान आहे. तसेच कामठवाडी येथे नविन शाळा खोली बांधणे करीता रु. ८.७५ लक्ष, पारदरा येथे नविन अंगणवाडी इमारत बांधकाम करणे करीता रु. ८.५० लक्ष, गोडसेदरा रस्ता व सी.डी वर्क करीता रु. ८ लक्ष, जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत साधी विहीर करणे करिता ७.८० लक्ष रुपये अशा विविध कामांचा समावेश असून लवकरच ते काम आहे सुरू करणार असल्याचे सभापती यांनी सांगितले सध्या कोरोणाचे संकट आपल्यावर आले असून त्याला आपण खंबीरपणे तोंड दिले आहे परंतु पूर्णपणे संकट जाईपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी सुरक्षित राहावे जपून वागावे माक्स लावावा असेही सभापती यांनी सांगितले बांधकाम समिती पहिल्यांदाच पारनेर तालुक्याला मिळाली असुन त्याचा उपयोग निश्चितच मी पारनेर तालुक्याला करुन दिला असून कोट्यवधी रुपयांची विकासकामे तालुक्यामध्ये आणले आहे. आणि यापुढेही ते करतच राहील असेही सभापती काशिनाथ दाते सर म्हणाले. पंचायत समितीचे सभापती गणेशराव शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की माजी आमदार विजयराव औटी यांच्या पराभवानंतर विकास कामे थांबतील असे वाटले होते. परंतु दाते सरांना जिल्ह्याचे बांधकाम समितीचे चेअरमन पद मिळाले आणि कामे तेवढ्याच गतीने सुरू झाली आपला परिसर डोंगराळ भाग असल्याने आपण पंचायत समिती मार्फत मीनाताई ठाकरे जल योजना राबवून वाड्या-वस्त्यांवर पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम मार्गी लावणार असल्याचे सभापती यांनी सांगितले तसेच काही लोक केक कापायचे आता कलिंगड कापायला लागली आहेत आपण असे काही करत नाही त्यामुळे सभापती दाते सरांच्या माध्यमातून तालुक्यात विकास कामे मार्गी लावण्यात येतील असेही त्यांनी सांगितले यावेळी वारणवाडी चे सरपंच संतोष मोरे, उपसरपंच जानकू दुधवडे ,पोखरी चे सरपंच सतीश पवार, ग्रामपंचायत सदस्य संजय काशीद ,आशाबाई थोरात, चेअरमन बाबासाहेब रोकडे ,दत्ता आहेर, गणेश बेलकर, अण्णा पवार, बाळासाहेब कोकाटे,बबन काशीद,  पोपट आहेर, संजय थोरात ,विजय गुंड ,एकनाथ दुधवडे, नामदेव दुधवडे, साहेबराव काशिद, बाळासाहेब काशीद ,गणपत कोकाटे ,विठ्ठल काशीद, अर्जुन कोकाटे ,विठ्ठल बेलकर, अण्णा काशीद,  विठ्ठल मेजर, सतीश काशीद, विष्णू कोकाटे, गंगाराम काशीद,भाऊ काशीद, अशोक पिंगळे, दत्ता काळे, किसन काशीद, ग्रामसेवक सुधाकर जाधव ,ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश बेलकर, पंढरीनाथ कोकाटे, कामाचे ठेकेदार स्वप्निल आग्रे, बबन वाळुंज उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय काशीद यांनी केले तसेच दत्ता आहेर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here