गुंडेगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

गुंडेगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

 गुंडेगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
गुंडेगाव  (ता. नगर) गावातील ग्रामपंचायत मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. सरपंच मंगलताई सकट यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयावर शिवस्वराज्य ध्वज फडकवून त्यचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच संतोष भापकर  , ग्रामसेवक अशोक जगदाळे, बबनराव हराळ पाटील  ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ  , सतिश चौधरी , माजी संरपच संजय कोतकर, सुनिल भापकर, संतोष धावडे, राहुल चौधरी मेजर, चेअरमन महादेव चौधरी , संतोष सकट, प्रदिप भापकर,उद्योगजक   सचिन जाधव, संदिप धावडे    आदी उपस्थित होते.
शासनाच्या आदेशाप्रमाणे साधेपणाने व उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास गावातील शिवप्रेमींनी सहभाग गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर म्हणाले की, देश मोठ्या संकटातून जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य जगण्यास बळ देतात. देशाला खर्या अर्थाने रयतेच्या राजेंची गरज आहे. शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य घटक केंद्रबिंदू माणून आदर्श राज्य निर्माण केले. त्यांची रणनिती व राज्यनिती सर्वांना आदर्श असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. ग्रामसेवक अशोक जगदाळे यांनी ग्रामस्थांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment