प्रत्येक शेतकरी कष्टकर्‍यांसाठी शिवराज्याभिषेक दिन हा स्वातंत्र्यदिनच : कापरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

प्रत्येक शेतकरी कष्टकर्‍यांसाठी शिवराज्याभिषेक दिन हा स्वातंत्र्यदिनच : कापरे

 प्रत्येक शेतकरी कष्टकर्‍यांसाठी शिवराज्याभिषेक दिन हा स्वातंत्र्यदिनच : कापरे

स्मायलिंग अस्मितातर्फे 348 वा शिवराज्याभिषेक दिन साखर वाटून साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरात स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने 348 वा शिवराज्याभिषेक दिन साखर वाटून साजरा करण्यात आला. यावेळी कोरोनामुळे मोजके शिवप्रेमी उपस्थित होते, विजयराव कापरे आणि अभिजित दरेकर यांनी प्रथम शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भाऊसाहेब मरकड यांनी उपस्थितांना व वाटसरूंना साखर वाटून तोंड गोड केले. काही वेळातच अनेक जण व्हिडिओ कॉलव्दारे सहभागी झाले होते.
यावेळी शेवगाव तालुक्यातील उच्च शिक्षीत सामाजिक कार्यकर्ते विजयराव कापरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी जमिन मोजमाप केले. रयतेला 6 जून 1674 या शिवराज्याभिषेकानंतर धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य मिळाले. स्वराज्यात लष्कराला तनखा सुरू करून जगातील नवा पायंडा छत्रपतींनी घालून शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही सैन्याने हात लावू नये असे निर्देश दिले; यामुळचे प्रत्येक शेतकरी कुटुंबातील व्यक्तींना स्वराज्य आपले एक कुटुंब आहे, अशी भावना निर्माण झाली.
अध्यक्षस्थानी व्हिडिओ कॉलिंगव्दारे विद्यार्थी चळवळीचे ऊर्ध्वयु अजितराव कोतकर होते.कोतकर म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे दख्खन भूमिचे राजे नव्हते तर ते सबंध हिंदुस्थानातील शेतकरी कष्टकर्‍यांचे पालक होते. या हिंदूस्थानात अनेक राजे, महाराजे, सुलतान आणि बादशहा झाले. मात्र छत्रपती एकच झाले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते जनतेला आजच्या लोकशाहीत इतके प्रिय आहेत की त्यांना लोक रयतेचा राजा म्हणतात. छत्रपतींनी हिंदुस्थानातील पहिले नौका दल स्थापन केले म्हणून त्यांना भारतीय सागरी दलाचे संस्थापक म्हणतात.
यावेळी इतिहास अभ्यासक अभिजित दरेकर व स्मायलिंग अस्मितेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
सध्या छत्रपतींच्या राज्यव्यवस्थापनाचे धडे केंद्र व राज्य सरकारने अमलात आणत शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षीत विद्यार्थ्यांच्या रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे अशी अपेक्षा शेतकरी विद्यार्थी महासंघाचे योगेश गागरे यांनी व्यक्त केली. यावेळी दत्ताकाका वडवणीकर, संदिप थोरात, राजेंद्र कर्डीले, विकी रोहोकले, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना भाऊसाहेब मरकड यांनी केली तर आभार प्रदर्शन व्हिजन अ‍ॅकडमीचे संचालक शुभम मिसाळ यांनी केले.

No comments:

Post a Comment