आर्यवीर फाऊंडेशनच्या 'एक झाड माझे सुद्धा' उपक्रमाला राज्यात प्रतिसाद.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

आर्यवीर फाऊंडेशनच्या 'एक झाड माझे सुद्धा' उपक्रमाला राज्यात प्रतिसाद..

 आर्यवीर फाऊंडेशनच्या 'एक झाड माझे सुद्धा' उपक्रमाला राज्यात प्रतिसाद..

मुंबईत सलाम बॉम्बे फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनांची वृक्ष लागवड!



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत आर्यवीर फाऊंडेशनने सुरू केलेल्या 'एक झाड माझे सुद्धा ' या मोहिमेचे उदघाटन शिवव्याख्याते  प्रा.डॉ. रमेश कळमकर यांच्या हस्ते १०  झाडे लावून झाले.पिंपळगाव तुर्कचे ग्रामपंचायत सदस्य सुनिल शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

      राज्यभरातून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.६ जून ते ६ ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 'एक झाड माझे सुद्धा' या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.पुणे,सांगली,सातारा या जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळत आहे.

        पारनेर तालुक्यात विविध मान्यवरांनी  एकूण ५० झाडे लावत उपक्रमात सहभाग नोंदवला. तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष  संजय वाघमारे,तहसीलदार ज्योती देवरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसीम राजे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले,वृक्षमित्र लतीफ राजे,शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष कारभारी बाबर,यांसह अनेक मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. त्याचप्रमाणे पुणे  (२३), सातारा (२), सांगली (८) तर  दिल्ली येथील दोन व्यक्तींनी या उपक्रमात पहिल्याच दिवशी सहभाग नोंदवला.

      मुबंईसारख्या शहरी भागात सलाम बॉम्बे फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेच्या माध्यमातून संयुक्तपणे राबवलेल्या 'एक झाड माझे सुद्धा' उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.या दोन्ही संघटनांनी ८० वृक्षांचे रोपण केले‌.त्याच बरोबर वृक्षसंवर्धनाचे काटेकोर नियोजन केले.सलाम बॉम्बे फाउंडेशनचे सहायक व्यवस्थापक नारायण लाड, खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे व राज्य सहसचिव भानुदास शिंदे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला

एक झाड माझे सुद्धा'उपक्रमास राज्यभरातून प्रतिसाद

कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर प्राणवायू, वृक्षलागवड व संवर्धनाचे महत्व अधोरेखित झाले आहे.वृक्षलागवड व संवर्धन जनजागृतीसाठी आर्यवीर फाऊंडेशनने'एक झाड माझे सुद्धा' या उपक्रमाचे आयोजन केले.दोन महिने चालणाऱ्या या उपक्रमात पहिल्याच दिवशी १६५ झाडे लावण्यात आली. राज्यभरातून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.प्रत्येकी एक झाड लावून प्रत्येक व्यक्तीने उपक्रमात सहभागी व्हावे.

अरुण वाळूंज,अध्यक्ष आर्यवीर फाऊंडेशन

No comments:

Post a Comment