साकत ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळवाडी येथे नियमित पाणीपुरवठ्यासाठी "हंडामोर्चा" काढण्याचा इशारा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

साकत ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळवाडी येथे नियमित पाणीपुरवठ्यासाठी "हंडामोर्चा" काढण्याचा इशारा.

 साकत ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळवाडी येथे नियमित पाणीपुरवठ्यासाठी "हंडामोर्चा" काढण्याचा इशारा.



नगरी दवंडी

जामखेड - साकत ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळवाडी येथे गेली २० वर्षापासुन होत असलेला अनियमित पाणीपुरवठा त्वरित नियमित करावा. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात हंडामोर्चा काढण्यात येईल असा ईशारा पिंपळवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.या बाबत तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली वीस वर्षापासून गावाला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून पाठपुरावा केला जात आहे. मात्र प्रशासन गांभीर्याने घेत नाही. पाईपलाईन लिकेज आहे. विहीरीत पाणी नाही. पाणी पुरवठा कर्मचारी पाणी सोडत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. गावात दोन ग्रामपंचायत च्या विहिरी व १ कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करून मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम करण्यात आले आहे. असे असले तरी विहीरवरून पाणी शेंदून आणावे लागत आहे. यामुळे काही महिलांचा तोल जाऊन अनेक अपघात झाले आहेत. तर दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा गावकर्‍यांच्या वतीने हंडा मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. 

 याबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या सह विविध ठिकाणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की.यावेळी दिलेल्या निवेदनावर लक्ष्मण घोलप, विशाल नेमाने, योगेश नेमाने, अजय नेमाने, अक्षय मोहिते, विजय घोलप, ऋषिकेश सतिष घोलप, शिवनाथ घोलप यांच्या सह २० ते २५ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment