विरोली ला ६५ लक्ष रुपयाचा निधी मंजुर. ग्रामस्थानी व्यक्त केले समाधान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

विरोली ला ६५ लक्ष रुपयाचा निधी मंजुर. ग्रामस्थानी व्यक्त केले समाधान.

 विरोली ला ६५ लक्ष रुपयाचा निधी मंजुर.

ग्रामस्थानी व्यक्त केले समाधान.

कोवीड सेंटरला भेट देऊन आमदार निलेश लंकेचे मानले आभार. 



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील विरोली या छोटया खेडेगावासाठी आमदार निलेश लंके यानी मनाचा मोठेपणा दाखवुन तब्बल ६५ लाख रुपयाचा निधी विकास कामासाठी दिल्याने विरोली ग्रामस्थानी आनंद उत्सव साजरा केला.

पारनेर कान्हूर पठार रोडवरील गणपती चौफुला विरोली हददी मध्ये सभागृह बांधण्या साठी २५१५ शिर्षाअंतर्गत ५० लक्ष रुपये व श्री क्षेत्र पिंपळेश्वर मंदिर परीसर सुशोभीकरणासाठी १५ लक्ष रुपये निधी आमदार निलेश लंके यांच्या  खास प्रयत्नातुन मंजुर करण्यात आल्याने ग्रामस्था मध्ये समाधानाचे वातावरण आहे.

ग्रामस्थानी आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार अरोग्य मंदिर ( कोवीड सेंटर ) येथे भेट देऊन आमदार लंके यांचे आभार मानले .

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार लंके म्हणाले की विकास कामेही निरंतर चालणारी प्रक्रिया आसुन यामध्ये आत्यावश्यक काम कोणते हेही पाहील पाहीजे विरोली हे गाव शांत आणि सयमी आसुन जेष्ठ किर्तनकार वै . हभप नाना महाराज वनकुटेकरांच्या संस्कारात वाढलेले गाव असल्याने या गावाला विकासासाठी निधी कमी पडणार नाही दर्जेदार काम होण्यावर आपला भर असणार आहे या पुढील काळातही विकास कामासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासनही दिले .

यावेळी संजय मोरे , संजय मते , हनुमंत भागवत , पोपट रेपाळे , कचरू मते माजी उपसरपंच भिमाजी मते , माजी उपसरपंच रभाजी मते, बाबाजी गाडगे , बाबाजी मते , मिरचीचे व्यापारी बाळासाहेब भागवत , अनिल भागवत आदी विरोली ग्रामस्थ उपस्थित होते . तर निलेश लंके प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी संदिप रोहोकले, सत्यम निमसे , दिपक मुळे जितेश सरडे , सचिन पठारे सुरज भुजबळ माजी पं.स . सदस्य राजेंद्र चौधरी  आदी मान्यवर उपस्थित होते .

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी उपस्थितांचे आभार मानले .


चौकट

 अन्  माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या विकास कामाच्या जागावल्या आठवणी 

विरोली सारख्या छोटया खेडेगावाकडे शक्यतो लोकप्रतिनिधीच दुर्लक्षच असते . मात्र १९९०च्या दरम्याण माजी आमदार नंदकुमार झावरे यानी विरोली येथील मोरे वस्ती ( दलित वस्ती ) येथे जिल्हातील पहिले अद्यावत समाज मंदिर बांधले व विरोली कान्हुर रस्ता दीड किलोमिटर खडीकरण डांबरीकरण रस्ता पाहिल्यांदा दिला या आठवणी ग्रामस्थानी जाग्या केल्या . त्याचप्रमाणे आमदार निलेश लंके यानी गावाला दिलेला भरूभरूण निधीमुळे लंके हे ग्रामस्थांच्या गळ्यातील ताईत बनले 


फोटो ओळी ....

विरोली गावाला आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातुन ६५ लक्ष रुपये विकास निधी मिळाल्या बद्यल त्यांचे आभार व्यक्त करताना संजय मोरे ,पोपट रेपाळे, बाळू भागवत , हनुमंत भागवत ,कचरू मते ,भिमाजी मते, संजय मते ,रभाजी मते आदी .

No comments:

Post a Comment