गुन्हांचा प्रलंबित तपास पूर्ण करून फरार आरोपींना शोधून अटक करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

गुन्हांचा प्रलंबित तपास पूर्ण करून फरार आरोपींना शोधून अटक करा.

 गुन्हांचा प्रलंबित तपास पूर्ण करून फरार आरोपींना शोधून अटक करा.

नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आदेश...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे व जे आरोपी फरार आहेत, त्यांना शोधून अटक करावी. तसेच जिल्ह्यामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांचा तपास तात्काळ करावा, असे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अवस्थी दोरजे यांनी दिले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. जिल्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा आढावा त्यांनी घेतला. लॉकडाऊन काळात ज्या केसेस केलेल्या आहेत, त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येईल का हे पाहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सध्या कोरोनाचा विषय सुरू आहे. त्यामुळे उपाययोजनांबरोबरच खबरदारीही सर्वांनीच घेतली पाहिजे. म्हणून आता नव्याने बीट मार्शल प्रत्येक ठिकाणी कार्यान्वित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या असल्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले.
कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात असून, त्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाने खबरदारी घ्यावी. ज्या पोलिसांचे लसीकरण झाले नाही, तेसुद्धा तात्काळ पूर्ण करावे. स्थानिक पातळीवर जी काही मदत आपल्याला करता येईल ती करा. पोलिस दलामधील ज्यांचे लसीकरण पूर्णत्वाला गेले आहे, त्याची खात्री करा. ज्यांना लस दिलेली नाही, त्यांचे तात्काळ लसीकरण कसे होईल हे त्वरित पाहावे. तसेच जे पोलिस कर्मचारी कोरोनातून बरे झालेले आहेत व आता घरी उपचार घेत आहे, अशांच्या संदर्भामध्ये विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या उपचार पद्धतीची माहिती सातत्याने घ्यावी, अशा सूचनाही दोरजे यांनी दिल्या असल्याचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यामध्ये व नगर शहरामध्ये असणार्‍या खासगी व शासकीय रुग्णालयांच्या ठिकाणी व परिसरात रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तेथे आल्यानंतर जेवणासाठी सुद्धा त्यांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्याच्या उपाययोजनांमध्ये रुग्णालयांबाहेरची गर्दी कमी करता येईल का,  यादृष्टीने विशेष उपाययोजना कराव्यात, असे आदेश ही अवस्थी दोरजे यांनी काल दिले. दोरजे यांनी नगर जिल्ह्यातील पोलिस विभागाचा आढावा येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आदींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment