घोटवी सोसायटी चेअरमनपदी बाबासाहेब बारगुजे तर बबन कदम यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

घोटवी सोसायटी चेअरमनपदी बाबासाहेब बारगुजे तर बबन कदम यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड

 घोटवी सोसायटी चेअरमनपदी बाबासाहेब बारगुजे तर बबन कदम यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी विविध सहकारी कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकी नंतर सहाय्यक निबंधक यांनी चेअरमन, व्हा.चेअरमन निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यासाठी मतदान घेवून चेअरमनपदी बाबासाहेब बारगुजे तर बबन कदम यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी सोसायटीचा कार्यकाळ पूर्ण होऊन झालेल्या निवडणुकीत नंतर सहाय्यक निबंधक यांनी चेअरमन, व्हा.चेअरमन निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यासाठी मतदान घेतले.
त्यावेळी सर्व संचालक मंडळाने एकमुखाने चेअरमनपदी बाबासाहेब बारगुजे तर बबन कदम यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रावसाहेब खेडकर यांनी काम पाहिले. त्यांना सहायक म्हणून सचिव सोमनाथ निंभोरे यांनी मदत केली. यावेळी सोसायटी संचालक बिभीषण निंभोरे, राजेन्द्र निंभोरे, समीर निंभोरे, शिवाजी बारगुजे, मच्छिंद्र शिंदे, शरद निंभोरे, अतुल बारगुजे, संतोष निंभोरे, सौ. सुरेखा निंभोरे, सौ. कांताबाई निंभोरे उपस्थित होते. तर कूकडी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन एकनाथ बारगुजे, माजी सरपंच सखाराम कदम, प्रा. विजय निंभोरे, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करत पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment