निसर्ग हे सोन आहे -आ.संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 15, 2021

निसर्ग हे सोन आहे -आ.संग्राम जगताप

 निसर्ग हे सोन आहे -आ.संग्राम जगताप

मोहिनी नगर येथे आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण मोहिमेस सुरवात


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः विकास कामा बरोबर निसर्गाचे जतन करणे गरजेचे आहे. पर्यावरणामध्ये दिवसेंदिवस बदल होत चालला असल्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे,यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून संवर्धन करावे निसर्ग हे सोने आहे त्याचे जतन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वृक्ष आपल्याला मोफत ऑक्सिजन देण्याचे काम करतो, ऑक्सिजनच्या अभावी आपण जगु शकत नाही पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.वृक्षारोपण ही एक लोकचळवळ व्हावी यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, स्थायी समितीचे मा.सभापती मनोज कोतकर यांच्या पुढाकाराने केडगाव परिसरामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाची चळवळ उभी करण्याचे काम केले आहे हे काम कौतुकास्पद असून,इतर भागातील नागरिकांनी याचे अनुकरण करावे जेणे करून नगरशहर हरित होण्यास मदत होईल असे प्रतिपादन,आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
केडगाव मोहिनी नगर परिसरामध्ये स्थायी समितीचे मा.सभापती मनोज कोतकर यांच्या माध्यमातून आ.संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली यावेळी नगरसेवक गणेश भोसले, बाबासाहेब वायकर, प्रसाद आंधळे, भरत भंडारी विजय शिंदे, उमेश ठोंबरे केतन कळमकर, रमण घोडेराव, घनश्याम बांडे, नवनाथ घोडे, शुभम आंबेकर, शुभम नलावडे गणेश ठोंबरे, सत्यम बडे सुरेंद्र दराडे, रामेश्वर ढगे अभिषेक नलावडे, राम नन्नवरे, केदारे सर, धाईंजे शिरीष, कोमल वायकर, सुनिता झरेकर, अलका जाधव, संगीता ठोंबरे, भिमाबाई बडे, नीता नलावडे, विमल ठोंबरे, विद्या शिंदे,पूजा वाडेकर, संतोषी नाईक,संगीता पाटील, श्याम कोतकर, बच्चन कोतकर, जनहित फाऊंडेशनचे  वैभव कदम, सोनू दादा घेबूंड, अजित कोतकर ,विजय सुंबे, अशोक कुटे, नवनाथ कोतकर, मोहन औटी असेच प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक मनोज कोतकर पुढे म्हणाले की, प्रभागातील नागरिकांना एकत्रित करून एक वृक्ष एक मित्र समितीची स्थापना केली यामाध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमेचा वसा अखंड रित्या चालू केला. प्रत्येक वर्षी आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाची मोहीम राबवली जाते, वृक्षारोपण मोहिमेमध्ये प्रभागातील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत असतात.त्यामुळे प्रत्येक वर्षी लावलेले वृक्ष जगविण्याचे काम केले जाते, आज केडगाव देवी परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांचे जतन झाले आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here