उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे मनोबल वाढविण्याचे काम - झंवर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 21, 2021

उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे मनोबल वाढविण्याचे काम - झंवर

 उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे मनोबल वाढविण्याचे काम - झंवर

महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वांनाच अनेक संकटांचा सामना करावा लागला. प्रत्येकाच्या मनामध्ये भितीचे वातावरण होते. अशा परिस्थितीत एकमेकांना आधार देण्याची आवश्यकता होती. या काळात माहेश्वरी युवक संघटनेने कार्यरत राहून समाजासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे मनोबल वाढविण्याचे काम केले. समाजातील सर्वांची आरोग्य तपासणी तसेच मदतरुपाने उभे राहुन धीर देण्याचे काम केले. मुलांसाठी स्पर्धा आयोजित करुन त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला. समाजातील उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात परंतु सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे त्यास काही प्रमाणात निर्बंध असले तरी युवकांनी कौशल्याने राबविलेले उपक्रम त्यांचे समाजाप्रती असलेले सद्भवना लक्षात येते. यासाठी अनेकांचे जे सहकार्य लाभले तेही कौतुकास पात्र आहेत. यापुढेही असेच समाजाची एकजूट राहून समाजोन्नत्तीचे काम सुरु राहील, अशी अपेक्षा रामकृष्ण अर्बन क्रेडिट सोसायटीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मीकांत झंवर यांनी व्यक्त केली.
महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रामकृष्ण अर्बन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मीकांत झंवर तसेच ओमप्रकाश चांडक, मोहनलाल मानधना, मुरलीधर बिहाणी, विनोद मालपाणी, जनमाबाई काबरा, गिता गिल्डा, मथुराबाई झंवर, डॉ.आर.बी.धूत, अ‍ॅड.अशोक बंग, राजेंद्र मालू, सुयोग झंवर, युवक संघटनेचे अध्यक्ष विशाल झंवर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी मोहनलाल मानधना म्हणाले, समाजाला एकत्र ठेवण्याचे काम युवक संघटनेच्या माध्यमातून होत आहे. समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडून विविध उपक्रमांद्वारे समाज संघटनेचे कार्य केले आहे. युवक संघटनेने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे.
प्रास्तविकात विशाल झंवर म्हणाले, कोरोना  परिस्थितीतही माहेश्वरी युवक संघटनेच्यावतीने समाजासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये नेत्र तपासणी शिबीर, अ‍ॅटीबॅडिज् चेकअप, मुलांसाठी चित्रकला, बुद्धीबळ, हस्तकला ऑनलाईन स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्यास समाजातून चांगला प्रतिसाद लाभला. संघटनेने वर्षभरातील या उपक्रमांद्वारे समाजाचे संघटन मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. महेश नवमीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करुन समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडले आहे. यामध्ये समाजातील ज्येष्ठाचे मार्गदर्शन व युवकांचे मोठे सहकार्य मिळाले. या रक्तदान शिबीरासाठी श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटीचे सहकार्य लाभले. या शिबीरात एकूण 81 रक्तपिशव्यांचे रक्त संकलन झाले. यावेळी कोरोना काळात विविध संस्थांनी केलेल्या कार्याचा गौरव मान्यवरांच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री झंवर यांनी केले तर आभार सचिव शेखर आसावा यांनी मानले. या उपक्रमासाठी संघटनेचे शाम भुताडा, गणेश लढ्ढा, शेखर आसावा, अनिकेत बलदवा, अमित काबरा, अमित जाखोटिया, संकेत मानधना, उमेश झंवर, सिद्धार्थ झंवर, सुमित बिहाणी, सुमित चांडक, प्रतिक सारडा, कुणाल लोया, योगेश सोमाणी, पियुष झंवर, संकेत अट्टल, तेजल गिल्डा आदिंनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment