अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रातून पुरोगामी विचार आणि समाजहिताची प्रेरणा मिळते : कजबे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रातून पुरोगामी विचार आणि समाजहिताची प्रेरणा मिळते : कजबे

 अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रातून पुरोगामी विचार आणि समाजहिताची प्रेरणा मिळते : कजबे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र आजही समाजाला दिशा देणारे असून, समाजात जे आर्थिक सहाय्य मिळवून लहान-मोठ्या व्यवसायातून प्रगती कडे जातात अशांना पाठबळ देण्याची प्रेरणा अहिल्यादेवींच्या चरित्रातून मिळते म्हणून आर्थिक संस्थेच्या माध्यमातून आपण संस्थेची प्रगती करताना समाजहित जोपासत आहोत.हे कार्य पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन ठरते. असे प्रतिपादन पुण्यश्लोक आहिल्यादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राणबा कजबे यांनी केले.
भिस्तबाग येथील पतसंस्थेच्या कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती सुरक्षित अंतर पाळून साजरी करण्यात आली.यावेळी चेअरमन श्री.कजबे बोलत होते समारंभाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना श्री.कजबे पुढे म्हणाले स्वतःचे कौटुंबिक जीवन कष्टप्रद असतानाही प्रजेच्या हितासाठी अहिल्यादेवी अखेरपर्यंत कार्यरत होत्या त्यांनी पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला.
पतसंस्थेचे संचालक साहेबराव कजबे, सिताराम कजबे आदींनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याची महती सांगून त्यांचा गौरव केला.प्रारंभी चेअरमन श्री.कजबे यांनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले व्यवस्थापिका सौ.वैशाली गाडे यांनी प्रास्तविक केले पिग्मी एजंट मनवेलीकर यांनी सूत्रसंचालन केले,तर एजंट श्री.देशमुख यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment