महिला ग्रामसेवकास मारहाण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

महिला ग्रामसेवकास मारहाण.

 महिला ग्रामसेवकास मारहाण.

वाळू ठेकेदारांवर गुन्हा दाखल.


शेवगाव ः
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत खड्डे खोदून वाळू उत्खनन करण्यास विरोध करणार्‍या महिला ग्रामसेवकास धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू वाहतूक करणार्‍या दत्तात्रय जायभाय यांचे विरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामसेवक संचिता शामूवेल दळवी शनिवारी (दि.5) सायंकाळी पाचच्या सुमारास प्रभूवाडगाव येथे शिवस्वराज्य दिनाची तयारी करण्यासाठी त्या चालल्या होत्या. त्यावेळी त्यांना तेथील ग्रामपंचायत शिवारातील शेती गट नं. 139 मध्ये गावासाठी नियोजित चालू असलेल्या विहिरीच्या कामाजवळ खोदून ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे निदर्शनास आले. ही जागा ग्रामपंचायतीची आहे. येथे खड्डे खोदून वाळू वाहतूक करू नका, असे ग्रामसेविका दळवी म्हणाल्या. त्यावर वाळू वाहतूकदार दत्तात्रय शिंदे, जायभाय याने ही जागा तुमच्या बापाची आहे का, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर त्यास येथून ट्रॅक्टर घेऊन जाऊ नकोस, असे ग्रामसेविकेने सांगितले. यावेळी ग्रामसेविकेने तहसीलदारांना मोबाइलवर संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. याचा राग आल्याने जायभाय याने ग्रामसेविकेला धक्काबुक्की केली. यात ग्रामसेविकेचे मंगळसूत्र गहाळ झाले. यावेळी जायभाय याने मारहाण, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे ग्रामसेविकेने फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत ग्रामसेवक दळवी जखमी झाल्याने त्यांना मनोहर अंगरखे व ग्रामपंचायत शिपाई गोरक्ष बटुळे यांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

No comments:

Post a Comment