नागापूरची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने ः अ‍ॅड. कापसे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

नागापूरची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने ः अ‍ॅड. कापसे.

 नागापूरची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने ः अ‍ॅड. कापसे.

नागापूरमध्ये 70 जणांचे लसीकरण.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः तालुक्यातील नागापुर  येथे ग्रामपंचायतच्या वतीने कोविड़ लसीकरण 12 जून रोजी घेण्यात आले. टोका प्रा.आ.केंद्राच्या वतीने यावेळी 70  गावकर्‍यांचे लसीकरन करण्यात आले.
यावेळी गावच्या वतीने आरोग्य कर्मचारी डॉ पुंड, डॉ चौरे आरोग्य सेविका , आशा सेविका यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सोशल डिस्टनसिंगचेही पालन करण्यात आले
यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच संदीप कापसे यांनी लसीकरनाचे महत्व सांगुन ग्रामस्थाचे प्रबोधन केले. सध्या गावात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही व लवकरच गावात पूर्ण टेस्ट करून 100%लसीकरन  करण्यात येईल असेही सरपंच कापसे म्हणाले.
यावेळी उपसरपंच राजेन्द्र काळे, सोसायटी चेअरमन अशोक काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच संदीप कापसे, तन्टामुक्ती अध्यक्ष अंकुश काळे,मा चेअरमन भाऊसाहेब कापसे,संजय लवांडे,व्हा चेअरमन कैलास कापसे, संभाजी काळे, मा. चेअरमन सीताराम काळे व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते .लसीकरन यशस्वीतेसाठी टोका प्राथमिक आरोग्य कर्मचारी , आशा स्वयंसेविका व पुर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले आणि मुख्याध्यापक महेश देवतरसे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment