राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी विकास उडानशिवे, शहर सचिवपदी संतोष पठारे व सहसचिव रोहन चव्हाण यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 14, 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी विकास उडानशिवे, शहर सचिवपदी संतोष पठारे व सहसचिव रोहन चव्हाण यांची निवड

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी विकास उडानशिवे, शहर सचिवपदी संतोष पठारे व सहसचिव रोहन चव्हाण यांची निवड


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः नगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे काम आ.अरुणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांनी केले विकास कामाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शहरातील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा कल वाढला आहे.सर्व नगरकरांना विश्वासात घेऊन काम करीत आहे,वैयक्तिक प्रश्नांबरोबरच विकासाचे प्रश्न मार्गी लागत आहे.आज राष्ट्रवादीच्या शहर उपाध्यक्ष पदी विकास उडानशिवे,राष्ट्रवादीच्या शहर सचिवपदी संतोष पठारे,सहसचिव रोहन चव्हाण यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे ध्येयधोरणे शेवटच्या घटकांपर्यंत या युवकांच्या माध्यमातून घेऊन जाणार आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्रजी पवार यांचे विचार आजच्या युवा पिढीस मार्गदर्शन असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी विकास उडानशिवे,शहर सचिवपदी संतोष पठारे,सह सचिवपदी रोहन चव्हाण यांना निवडीचे पत्र देताना आमदार संग्राम जगताप समवेत शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिकराव विधाते,जिल्हा संघटन  राजेश भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे यावेळी उपस्थित  विकास गाडगे,लक्ष्मण साबळे,विकास वालेकर,गणेश मिसाळ,अनिल डेरे,नरेश आडेप,अक्षय बाबूळके,योगेश पोटे,प्रशांत शिंदे, किशोर शिंदे,अजित गाळी,चेतन शेराल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment