राहरीच्या उपनगराध्यक्ष भुजाडींनी दिला राजिनामा कारण गुलदस्त्यात? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 14, 2021

राहरीच्या उपनगराध्यक्ष भुजाडींनी दिला राजिनामा कारण गुलदस्त्यात?

 राहरीच्या उपनगराध्यक्ष भुजाडींनी दिला राजिनामा कारण गुलदस्त्यात?

राहुरी ः राहुरी नगरपालिकेच्या उपनगरध्य सुर्यकांत भुजाडी यांनी उपनगध्यक्षपदाचा राजिनामा नगराध्यक्ष अनिल कासार यांच्याकडे दिल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे .नुकतेच विरोधी गटाकडुन पत्रकार परिषदेत रेमडिसिवर लस मधे गैर व्यवहार झाला? असा असल्याचा आरोप करण्यात आला होता. भुजाडी हे सहा महिन्यापासुन उपनगरध्यक्ष पद भुषवत होते.त्यांचा राजिनामा घेतला की ? दिला या बाबत वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे . तर अधिक अशी माहिती समजली आहे की, सत्ताधारी गटाच्या संमतीतून ठरल्याप्रमाणे प्रत्येक सदस्यला उपनगराध्यपदाची संधी देणार असल्याचे ठरले होते . त्या नुसार सुर्यकांत भुजाडी यांची मुदत संपल्याने त्यांनी उपनगरध्यक्षपदाचा राजिनामा दिला असल्याचे पालिकेच्या काही सदस्यांकडुन माहीती समजली आहे . भुजाडी यांनी राजिनामा दिल्याने आता बाळासाहेब उंडे, ज्योती तनपुरे, अशोक आहेर, मुक्ताबाई करपे, नंदु तनपुरे, यापैकी एकाची निवड होउ शकते? मात्र वरिष्ठ नेते कोणाला हिरवा कंदिल मिळणार? व कोण उपनगरध्यक्षाच्या बाकावर बसणार? तो नव्याने विरजमान होणारा उपनगराध्यक्ष कोण ? हे लवकर मा.खा.प्रसाद तनपुरे, सभापती अरुण तनपुरे, ना.प्राजक्त दादा तनुपरे हे ठरवतील, अशी शहरात होत चर्चा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here