शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक प्रेरणादायी क्षण ः कोरगावकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, June 7, 2021

शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक प्रेरणादायी क्षण ः कोरगावकर

 शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक प्रेरणादायी क्षण ः कोरगावकर

शिवसेनेच्यावतीने राज्यभिषेक दिनानिमित्त अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खर्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणार्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे. या क्षणापासून शिवाजी महाराजांना राज्यमान्यता मिळाली व स्वराज्य परिपूर्ण झाले. रयतेचा राजा म्हणून महाराजांचा लौकिक वाढला. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच समाजोपयोगी कार्य करत आहे. जनतेला आपले राज्य वाटावे, असे स्वराज्य निर्माण करण्याचा महाआघाडी सरकारचा प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगांवकर यांनी केले.
शिवराज्यभिषेक दिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, नगरसेवक अनिल शिंदे, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, योगीराज गाडे, सचिन शिंदे, विजय पठारे, दत्ता जाधव, अमोल येवले, संतोष गेनप्पा, निलेश भाकरे, आनंद लहामगे, अशोक दहिफळे, काका शेळके, घनश्याम घोलप, सागर थोरात, रवी वडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांसाठी आणि रयतेसाठी हा आनंदाचा दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन. याच दिवशी महाराजांच्या नेतृत्वाखाली काळोखाचे तट कोसळून स्वराज्याचा सुर्योदय झाला. त्यानंतर रयतेचे राज्य निर्माण झाले. शिवसैनिक हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहेत. जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात, असे सांगितले.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच सर्वांचे आदर्श राहिलेले आहे. प्रत्येकाची प्रेरणा असलेले शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक म्हणजे संपूर्ण भारत वर्षासाठी मोठी गोष्ट होती. त्यावेळच्या भारतातील सर्वच राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यमान्यता दिली. ही घटना पुढील अनेक वर्षे सर्वांना प्रेरणा देईल.
यावेळी भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे आदिंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी फटाकांच्या अतिषबाजीत अभिवादन करण्यात आले.

No comments:

Post a Comment