शिवरायांच्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्यास समाजाचा उत्कर्ष ः कांगुणे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

शिवरायांच्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्यास समाजाचा उत्कर्ष ः कांगुणे

 शिवरायांच्या कार्यपद्धतीचा अवलंब केल्यास समाजाचा उत्कर्ष ः कांगुणे

शिवस्वराज्य दिनी नेवासा पंचायत समितीमध्ये राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळयाच्या शिवस्वराज्य दिनी नेवासा पंचायत समितीमध्ये राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्या आदर्श कार्यपद्धतीचा अनुकरण केल्यास
समाजाचा उत्कर्ष दूर नाही असे प्रतिपादन सभापती रावसाहेब कांगुणे यांनी यावेळी बोलताना केले.
नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नेवासा पंचायत समितीमध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी मुख्यप्रवेशद्वाराजवळ शिवराज्याभिषेक शिवराज्य दिनाच्या निमित्ताने भगवी गुढी उभारण्यात आली सभापती रावसाहेब कांगुणे,गटविकास अधिकारी शेखर शेलार,पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब सोनवणे, विक्रम चौधरी यांच्या हस्ते राजदंड स्वराज्य गुढीचे विधिवत पूजन यावेळी करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन यावेळी उपस्थित मान्यवर अधिकारी व महिला अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आले.हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय,हर हर महादेव ही शिव गर्जना करण्यात आली.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे म्हणाले की छत्रपती शिवरायांनी आपल्या आदर्शकार्यपद्धतीमध्ये उपेक्षित व वंचीत घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्याच पद्धतीने ज्यांनी स्वराज्य निर्माण केले असे सर्व बहुजन समाजाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेक दिनी शिवराज्य गुढी उभारण्याचा उपक्रम अभिमानास्पद असून नामदार शंकरराव गडाख यांच्या वतीने मी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचे स्वागत करून अभिनंदन करतो असे सांगून खर्‍या अर्थाने आज छत्रपती शिवरायांना सर्व महाराष्ट्राने मानवंदना दिली याचे समाधान वाटते असे स्पष्ट केले.
यावेळी पंचायत समितीच्या प्रत्येक विभागातील अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन शिवराज्य दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here