सोनी मराठी वर नवीन मालिका गाथा नवनाथांची, 21 जूनपासून सोम.- शनि., संध्या. 6:30 वा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

सोनी मराठी वर नवीन मालिका गाथा नवनाथांची, 21 जूनपासून सोम.- शनि., संध्या. 6:30 वा.

 सोनी मराठी वर नवीन मालिका गाथा नवनाथांची, 21 जूनपासून सोम.- शनि., संध्या. 6:30 वा.


हाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बर्‍याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर मालिका झाली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर मालिका घेऊन येते आहे. गाथा नवनाथांची ही मालिका 21 जूनपासून सोम.-शनि., संध्या. 6:30 वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.  आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा या मालिकेतून प्रेक्षकांना दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. मच्छिन्द्रनाथांच्या जन्माची कथा सर्वश्रुत असली, तरी त्यांच्या बालपणाबद्दलची माहिती फार लोकांना नाही, त्यांचं बालपण, संगोपन अशा गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.  मालिकेच्या टीमने त्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. काही प्रसंग दाखवण्यासाठी साठी विफेक्स या तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. मराठीत विफेक्सचा वापर फार कमी प्रमाणात गेला जातो. त्यामुळे या मालिकेतील विफेक्स हा एक महत्वपूर्ण आणि विशेष मुद्दा असणार आहे.  21 जूनपासून सोम.-शनि., संध्या. 6:30 वा. गाथा नवनाथांची ही मालिका प्रेक्षकांनी पहायला विसरू नका फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

No comments:

Post a Comment