कोरोनामुळे मयत मनपा कर्मचार्‍यांचे मदतनिधी प्रस्ताव तातडीने करा ः सागर बोरूडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

कोरोनामुळे मयत मनपा कर्मचार्‍यांचे मदतनिधी प्रस्ताव तातडीने करा ः सागर बोरूडे

 कोरोनामुळे मयत मनपा कर्मचार्‍यांचे मदतनिधी प्रस्ताव तातडीने करा ः सागर बोरूडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गेल्या दिड वर्षापासून कोरोना संसर्ग विषाणूचे रूग्ण शहरामध्ये मोठया प्रमाणात आढळत आहे. यामध्ये काही नागरिकांचा दुदैवी मृत्यूही झाला आहे. यामध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत होते. कॅन्टोन्मेंट झोन असतानाही मनपाचे कर्मचारी नागरिकांना  मुलभूत सुविधा देत होते. यामध्ये पहिल्या लाटेमध्ये मनपाचे 4 कर्मचारी व दुसर्‍या लाटेमध्ये 14 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू गमविलेले कर्मचारी हे कुटुंब प्रमुख आहेत त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. मा.केंद्रशासन परिपत्रकान्वये कोरोनामध्ये शासकीय कर्तव्य बजावत असताना ज्या कर्मचा-यांचा कोरोना आजाराने मृत्यू झालेला आहे. अशा कुटुंबियांना रक्कम रूपये 50 लाख देण्यात यावी असे परिपत्रक काढण्यात आले आहे.
मनपामध्ये ज्या कर्मचार्‍यांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. परंतु कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना मा.शासन परिपत्रकाची माहिती नसल्यामुळे आजतागायत त्यांनी मनपामध्ये कोणत्याही प्रकारची विचारपुस अथवा प्रस्ताव दाखल केलेला नाही त्यामुळे मनपातील मयत कर्मचा-यांचे कुटुंब या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे याकरिता मा.शासनाने काढलेल्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करण्याकरिता मनपाने सक्षम अधिकारी यांची नेमणुक करून कोरोनामध्ये दुदैवी मयत झालेल्या कर्मचार्‍यांच्या कागदपत्राची पुर्तता करून हा प्रस्ताव दि. 30/6/2021 पूर्वी मा.केंद्र शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. तरी अ.नगर मनपातील कोरोना आजाराने मयत झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांना मा.शासन परिपत्रकानुसार आर्थिक लाभ मिळण्याकरिता कारवाई करावी व संबंधीत विभागास आदेश देण्यात यावेत अशी मागणी आयुक्त श्री.शंकर गोरे यांचेकडे मनपा आरोग्य समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मा.डॉ.श्री.सागर बोरूडे यांनी केली.

No comments:

Post a Comment