पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार

 पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी कोरोनाच्या काळात पोलीस विभागाला बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
कर्जत येथे कोरोनाच्या काळात पत्रकारांनी प्रशासना बरोबर उभे राहून अत्यंत चांगले सहकार्य केले, प्रशासनाने दिलेली माहिती  प्रशासन जे काम करत आहे ते जनते पर्यत पोहचवणे, लसीकरणा साठी सुरू करण्यात आलेल्या टोकन वाटपात मदत करणे, जनतेच्या सोई साठी विविध उपाय योजना सुचवणे, प्रशासन चुकत असेल तर योग्य ठिकाणी योग्य प्रकारे व कधी आपल्या बातम्या द्वारे परखड पणे प्रशासनास त्याच्या चुका दाखवून देत जनतेच्या मनातील भावना व्यक्त करणे, अशा विविध प्रकारे सातत्याने सकारात्मक काम करत कर्जत तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस बिभागासह सर्वच प्रशासनाला वेळोवेळी मदत केली असल्याचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी करत याबद्दल सर्व पत्रकाराचा सत्कार करण्याचे आयोजन कर्जत पोलीस स्टेशन मध्ये केले,
कर्जत जामखेड तालुक्यासाठी अद्ययावत पोलिस चेकपोस्टचे लोकार्पण
पोलीस अधीक्षक मनोज पाटील व आ. रोहित पवार यांच्या हस्ते कर्जत येथे आयोजीत करण्यात आले होते या प्रसंगी सर्व पत्रकाराचा सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, सहा. पोलीस निरीक्षक सुरेश माने, उपनिरीक्षक अमरजीत मोरे, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, आदी सह पोलीस कर्मचारी, होमगार्ड व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकाराचा सामूहिक सत्कारासह उपस्थित प्रत्येक पत्रकाराचा वैयक्तीक सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment