गुंडेगाव येथे स्वखर्चाने रस्ता केला मुरमीकरण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 18, 2021

गुंडेगाव येथे स्वखर्चाने रस्ता केला मुरमीकरण

 गुंडेगाव येथे स्वखर्चाने रस्ता केला मुरमीकरण


नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः गुंडेगाव ( ता.नगर) येथील सतत पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आसून अनेक रस्त्यावर पाणी साचलेले आहे. यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते ही बाब लक्षात येता गुंडेगावचे उद्योगजक सतिश चौधरी व पत्नी ग्रामपंचायत सदस्य सौ. साधनाताई  सतिश चौधरी यांनी स्वखर्चाने गावठाण भागातील टकले दुकानदार लगतच्या रस्त्यावर स्वखर्चाने मुरमीकरण करण्यात आले आहे. यावेळी सतिश काका चौधरी यांच्याशी संपर्क साधला आसता सांगितले की गुंडेगाव ग्रामपंचायत च्या वतीने या वर्षी  मुरमीकरणासाठी तरतुद नसल्याने आम्ही  लोकांची गैरसोय व आरोग्य लक्षात घेता सामाजिक बांधिलकी समजून  मुरमीकरण केले आहे .
यासंदर्भात गुंडेगाव ग्रामपंचायत कडे माहिती घेतली आसताना सन 2021-22 या वित्तीय विकास आराखड्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत रक्कम 4,78,498 रुपयांची वाडी वस्ती व गावठाण रस्त्यावर मुरमीकरण करणे यासाठी तरतूद  करण्यात आली आसून हा निधी त्वरित खर्च करून पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते मुरमीकरण करावी आशी मागणी सतिश चौधरी,शैलेश पिंपरकर ,पत्रकार संजय भापकर याच्या वतीने करण्यात आली आहे. रस्त्यावर मुरमीकरण करत  सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल सतिश चौधरी याचे गावठाण भागातील  नागरिकांनी आभार मानले आहे.

No comments:

Post a Comment