कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह 12 जणांवर विनयभंगासह, अट्रोसिटीचा गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 24, 2021

कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह 12 जणांवर विनयभंगासह, अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

 कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह  12 जणांवर विनयभंगासह, अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ या ठिकाणी जमिनीच्या वादातून झालेल्या  कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह  12 जणांवर  पीडित महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगासह, अट्रोसिटीचा गुन्हा बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला असून गुन्हा दाखल होताच 3 आरोपींना अटक केली. तर कोथूळ सेवा संस्थेच्या चेअरमनसह  9 आरोपी फरार झाले असून त्याचा शोध बेलवंडी पोलिस घेत आहेत. तालुक्यातील कोतुळ येथील रोहिदास गबाजी धस यांची कोथुळ येथील गट नं . 211 ही  शेती सुमारे दीड वर्षापुर्वी इसार पावती करुन फिर्यदिने विकत घेतली असताना ती जमिन दिपाली मनोहर लाटे यांना व सोनाली धनंजय लाटे रा कोथुळ यांचे नावावर रोहिदास धस व भरत धस यांनी परस्पर विक्री केली. या बाबत श्रीगोंदा न्यायालयात दावा चालु असताना दि .23 जून रोजी सकाळी 9 वा.सुमारास फिर्यादी व फिर्यादी ची सासू सुभद्रा, सासरा बाजीराव व मुलगा  देवराज असे सर्वजन शेताचे बांधालगत असताना  आरोपी मनोहर सुधाकर लाटे, धनंजय सुधाकर लाटे, सुधाकर पांडुरंग लाटे, मिरा सुधाकर लाटे, सुभाष बापुराव लाटे, लक्ष्मण भगवान लाटे रा. कोथुळ, ता. श्रीगोंदा, रोहिदास गबाजी धस,  विलास रघुनाथ धस, बाळु रघुनाथ धस,  संजय हरिभाऊ धस, कैलास हरिभाऊ धस,  मारुती किसन सातपुते, नवनाथ मारुती सातपुते रा . घाटकोपर, मुंबई यांनी एकत्र येवुन आम्ही इसार पावती केलेल्या शेतात ट्रॅक्टर घालून मुगाचे पिक पेरले असताना फिर्यदीचे सासु, सासरे, मुलगा समजावून सांगत असताना त्यांनी एकत्रित येवुन फिर्यादी, सासु , सासरे , मुलाला जाती वाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहान केली. तर धनंजय लाटे , मनोहर लाटे , कैलास धस , विलास धस , रोहिदास धस यांनी फिर्यादीचा हात धरुन अंगातील गाऊन ओढला तसेच गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तसेच मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोथुळ सेवा संस्थेचे चेअरमन धनंजय लाटे यांच्यासह 12 जणांवर विनयभंगासह, अट्रोसिटीचा गुन्हा बेलवंडी पोलिस ठाण्यात दाखल झाला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here