सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत चालणार कामकाज जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत बदल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 28, 2021

सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत चालणार कामकाज जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत बदल.

 सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत चालणार कामकाज

जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत बदल.

प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी काढले आदेश.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आज (सोमवार) पासून न्यायालयाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 अशी असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने आजपासून पुन्हा निर्बंध वाढवले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील न्यायालयाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी काढले आहेत. सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. यावेळेत महत्वाची फौजदारी, दिवाणी प्रकरणांसह रिमांड प्रकरणांची सुनावणी चालणार आहे.
सुनावणीवेळी वकिल, पक्षकार, साक्षीदार, आरोपी गैरहजर असेल तर त्याबाबत विरूद्ध आदेश पारित करू नये. प्रत्येक शनिवारी न्यायालयाचे कामकाज (रिमांड वगळता) बंद राहणार आहे. न्यायालयाची वेळ 11 ते 2 अशी असल्याने त्यानंतर न्यायालयातील पार्किंगमध्ये कोणतेही वाहन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. ज्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाला असेल त्या प्रकरणांचा निकाल जाहीर करण्यास हरकत नसल्याचे आदेशात म्हटले आहे. न्यायालयातील कॅन्टींग, बाररूम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून 50 टक्के उपस्थितीवर कामकाज चालणार आहे. सदरचा आदेश आज (सोमवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here