भाजपाचे सचिन पोटरेचा आ रोहित पवार यांना अत्यंत कडवट प्रश्न - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

भाजपाचे सचिन पोटरेचा आ रोहित पवार यांना अत्यंत कडवट प्रश्न

 भाजपाचे सचिन  पोटरेचा आ रोहित पवार यांना अत्यंत कडवट प्रश्न

कर्जत तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते लायक वाटत नाहीत का?



नााग दवंडी 

कर्जत (प्रतिनिधी):-मतदार संघाचे प्रश्न समजून त्यावर सक्षम पणे बाजू मांडण्यासाठी त्याच तालुक्यातील व्यक्तीची नियुक्ती करणे आवश्यक असताना कुकडी सल्लागार समितीवर आ. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडचे प्रतिनिधी म्हणून शेजारच्या श्रीगोंदा तालुक्यातील घनश्याम शेलार यांची नियुक्ती करून जनतेचा विश्वासघात तर  केलाच आहे. याशिवाय गेली अनेक वर्षे निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ही अविश्वास दाखविला असल्याची जोरदार टीका भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी पत्रका द्वारे केली आहे. तालुक्यात सध्या महाविकास आघाडीत तीन जिल्हाध्यक्ष आहेत त्याचे सह इतर नेते लायक नाहीत का असा अत्यंत कडवट प्रश्न पोटरे यांनी थेट आ रोहित पवार यांना विचारला आहे.

           कर्जत तालुक्याला न मिळालेल्या कुकडीच्या आवर्तना मुळे सध्या तालुक्यातील शेतकरी चिंताक्रांत असताना या परिस्थितीस कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार हे जबाबदार असून त्याच्या ढिसाळ नियोजनामुळे व दुर्लक्षामुळे च कुकडीच्या आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असल्याचे म्हणत भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी आज आपण पत्रक काढून जोरदार टीकास्त्र सोडत आ. रोहित पवार यांचा तालुक्यतील महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यावर अथवा कार्यकर्त्यावर विश्वास नाही का असा प्रश्न उपस्थित करत एकच खळबळ माजवून दिली आहे. 

           जलसंपदा विभागाच्या वतीने दि 28 डिसें 2020 रोजी शासन निर्णय होऊन कुकडी लाभ क्षेतातील आमदारांनी आपल्या मतदारसंघातील कुकडीच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी, व आपल्या भागाला न्याय मिळवून देण्यासाठी  प्रत्येक मतदारसंघातील अभ्यासू शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून

कुकडीच्या सल्लागार समितीवर एक अशासकीय सदस्यांचे नाव कळविण्याची सूचना जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. त्या अनुषंगाने दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी कुकडी सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत चार विधानसभा सदस्यांनी अशासकीय सदस्या ची नावे देऊन त्याची निवड केली यामध्येआंबेगाव तालुक्यातील ना. दिलीपराव वळसे पाटील गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नागापूर तालुका आंबेगाव येथील देवदत्त जयवंतराव निकम यांची तर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी बेल्हे तालुका जुन्नर येथील अशोक विठोबा घोडके यांची व पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी कोकडी तालुका पारनेर येथील सुदाम बबन पवार या व्यक्तीची अशासकीय सदस्यत्वासाठी  शिफारस केली या सर्व आमदारांनी आपल्या मतदार संघातील प्रतिनिधी दिले परंतु कर्जत जामखेड मतदार संघाच्या वतीने आ. रोहितदादा पवार यांनी मात्र  श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते घनश्याम शेलार यांची नियुक्ती केली व जल संपदा मंत्री जयंत पाटील व कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता ह. तू. धुमाळ यांच्या संयुक्त सहीने या निवडी जाहीर ही करण्यात आल्या आहेत. 

               कर्जत तालुक्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एवढी मोठी फौज असताना तालुक्यातील लोकप्रतिनिधीना यातील एकही नाव लायक वाटले नाही का? फक्त निवडून येई पर्यंतच आपण यांचा वापर केला आहे का?  कर्जत तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ मनीषा गुंड, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुंड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड कैलासराव शेवाळे, माजी जि. प.  सदस्य प्रवीण घुले, शिवसेना नेते बळीराम यादव हे सर्व जण अनेक वर्षापासून आपल्या पक्षात निष्ठेने काम करणारे पदाधिकारी असताना कर्जत तालुक्याची बाजू मांडण्यासाठी व कुकडी सल्लागार समितीमध्ये तालुक्यांची रास्त बाजू मांडण्यासाठी दुसऱ्या तालुक्यातील प्रतिनिधी का?  कुकडीच्या प्रश्नावर व तालुक्यातील आवर्तनाच्या वेळी येणाऱ्या अडचणींवर श्रीगोंदा तालुक्यातील घनश्याम आण्णा शेलार हे कर्जत तालुक्याची बाजू मांडणार की श्रीगोंदा तालुक्याची? कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीच्या प्रश्नाबाबत न्याय मिळवून देऊ शकतात का? हे सर्व प्रश्न आता कर्जत तालुक्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे असून महा विकास आघाडीच्या कर्जत तालुक्यातील नेत्यांना हे मान्य आहे का? असे प्रश्न पोटरे यांनी उपस्थित केले असून कुकडीच्या महत्त्वाच्या विषयावर होणारा अन्याय व आपल्या कर्जत तालुक्याच्या अस्मितेचा झालेला प्रश्न सर्वसामान्यांच्या ही लक्षात येण्यासाठी व भविष्यात येणारी संकटे परतावून लावण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत 

No comments:

Post a Comment