शिक्षकाने मुलीचा वाढदिवस साजरा केला कोविड सेंटरमध्ये - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

शिक्षकाने मुलीचा वाढदिवस साजरा केला कोविड सेंटरमध्ये

 शिक्षकाने मुलीचा वाढदिवस साजरा केला कोविड सेंटरमध्ये

वाळूंजच्या कोविड सेंटरला वाफेचे मशीन, सॅनीटायझर, खोकल्याचे औषध, बिस्किट व फळांची भेट

 कोरोनाच्या लढ्यात माणुसकीच्या भावनेने एकमेकांना आधार देण्याची गरज -आमदार संग्राम जगताप



नगरी दवंडी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक तन, मन व धनाने आपले योगदान देत असताना, शिक्षकाने आपल्या मुलीचा वाढदिवस कोविड सेंटरमध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा केला. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे यांनी आपली मुलगी आरवी हिंगे हिच्या वाढदिवसानिमित्त सर्व खर्चांना फाटा देत, कोरोनाच्या परिस्थितीची जाणीव ठेऊन वाळूंज (ता. नगर) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित कोविड सेंटरला वाफेचे मशीन, सॅनीटायझर, खोकल्याचे औषधे, बिस्किटे, फळे आदी विविध वस्तू असलेल्या सुमारे पंचवीस हजार रुपये किंमतीची भेट दिली. 

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कोविड सेंटरला देण्यात आलेली विविध साहित्याची भेट डॉक्टर व परिचारिकांकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सविता हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, आरवी हिंगे, माजी सरपंच बाळासाहेब दरेकर, मकरंद हिंगे, अनुष्का हिंगे, विराज बोडखे, भाऊ पांडूळे, विजय शेळमकर, डॉ. अमृता पारकर, कदम मॅडम, संगिता मते आदी उपस्थित होते.  

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, कोरोनाच्या लढ्यात माणुसकीच्या भावनेने एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. संपुर्ण समाज दु:खात असताना आनंद साजरा करणे चुकीचे आहे. या भावनेने वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन कोविड सेंटरला हिंगे परिवाराने केलेली मदत प्रेरणादायी आहे. योग्य वेळेत कोरोनाचे उपचार केल्यास रुग्णाची प्रकृती गंभीर होत नाही. कोविड सेंटरमधून अनेक रुग्ण बरे होत आहे. नागरिकांनी आजारी पडल्यास त्वरीत चाचणी करुन कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्याचे त्यांनी सांगितले. 

पाहुण्यांचे स्वागत महेंद्र हिंगे यांनी केले. सविता हिंगे यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकी ठेऊन प्रत्येकाने योगदान देण्याची भावन विशद केली. बाबासाहेब बोडखे यांनी कोरोना रुग्णांची सेवा आमदार संग्राम जगताप सातत्याने करीत आहे. स्वत: कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देत आहे. कोरोना हा गंभीर आजार नसून, त्याला वेळेवर उपचार न केल्याने प्रकृती गंभीर बनत आहे. नागरिकांनी जागृक राहून वेळेवर उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कोविड सेंटरला शंभर वाफेचे मशीन, चार ड्रम सॅनीटायझर, दोन सॅनीटायझर स्टॅण्ड, दोन ड्रम खोकल्याचे औषध, बिस्किट, फळे व इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या. कोविड सेंटरमध्ये कोरोनातून बरे झालेल्या पंधरा ग्रामस्थांना निरोप देऊन घरी पाठविण्यात आले.

No comments:

Post a Comment