शहापूर-केकतीमधील दुर्बल घटकांना किराणा किटचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

शहापूर-केकतीमधील दुर्बल घटकांना किराणा किटचे वाटप

 शहापूर-केकतीमधील दुर्बल घटकांना किराणा किटचे वाटप

युवानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे, गणेश ढोबळे व रफिक मोगल यांची मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी सुरु असलेल्या टाळेबंदीत आर्थिक दुर्बल घटक असलेल्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना युवानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे, गणेश ढोबळे व रफिकभाई मोगल यांनी शहापूर-केकती (ता. नगर) येथील वाड्या वस्तींवर जाऊन जीवनावश्यक किराणा किटची मदत पोहचवली.  
शहापूर-केकती ग्रामपंचायत हद्दीतील यशवंतनगर व सैनिकनगर येथील तब्बल पन्नास गरजू कुटुंबीयांना किराणा किटसह मास्क देखील घरोघरी जाऊन देण्यात आले. युवानचे संस्थापक संदिप कुसळकर यांनी कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्या कामगारांचा रोजगार हिरावला आहे. अनेकांचे व्यवसाय व काम बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अशा परिस्थितीमध्ये युवानने गरजू घटकांना आधार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मदत पोहचवली असल्याचे स्पष्ट केले.
सतीश बोरुडे म्हणाले की, सध्या परिस्थिती बिकट आहे. घरात बसले तर उपाशीपोटी मरण्याची भिती, बाहेर पडलो तर कोरोनाची भिती आहे. अनेक कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न पडत आहे. उसणवारी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतील टाळेबंदीत कष्टकरी वर्ग कर्जबाजारी झाला असताना, या टाळेबंदीत जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजू घटकांना मदत पोहचविण्याचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश ढोबळे यांनी कोरोनाच्या महामारीत सर्वांनी एकमेकास सहकार्य केल्यास आलेले संकट टळणार आहे. प्रत्येकाने माणुसकी जिवंत ठेऊन गोर-गरिबांना आधार देण्याचे त्यांनी आवाहन केले. किराणाची मदत घरपोच मिळाल्याने अनेकांच्या चेहर्यावर समाधान होते. या उपक्रमास कुमार लोखंडे, आनंद बोरुडे, धिरज ढोबळे आदींसह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment