नगरमधील सामाजिक संघटनांच्या योगदानाची इतिहासात नोंद होईल : आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

नगरमधील सामाजिक संघटनांच्या योगदानाची इतिहासात नोंद होईल : आ. जगताप

 नगरमधील सामाजिक संघटनांच्या योगदानाची इतिहासात नोंद होईल : आ. जगताप

इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात अँटीबॉडी तपासणी अभियान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात नगर शहरातील सामाजिक संघटना देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. करोना चाचणी, कोविड केअर सेंटर, रूग्ण व नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था अशा प्रत्येक गोष्टीत या संघटना पुढे आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणेच या संघटनांचे सभासदही करोना योध्द्याप्रमाणेच काम करीत आहेत. अँटीबॉडी तपासणी अभियान राबवून या संघटनांनी कोविड काळात महत्त्वपूर्ण काम केले आहे. अनेक माध्यमातून कोविड महामारीत योगदान देणार्‍या या संघटनांचे कार्य ऐतिहासिक ठरेल, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
नगरमधील 9 सामाजिक संघटनांनी एकत्र येत सोमवारी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात नागरिकांसाठी अँटीबॉडी तपासणी अभियान राबविले. या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी आ.जगताप बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, धनेश कोठारी, अमित मुथा, संदीप देसर्डा, राजेंद्र बोथरा, निरज काबरा, तुषार चोरडियां, चेतन भंडारी, राकेश भंडारी, शैलेश मुनोत, सत्येन मुथा, हेमंत मुथा, राजू शेटिया, विशाल झंवर, संदीप बायड, मनिष सोनग्रा, रोशन चोरडिया,श्याम भुतडा, गणेश लड्डा, ’थायरोकेअर’चे सूरज जोशी, बाबासाहेब सांगळे आदी उपस्थित होते.
मनपा आयुक्त शंकर गोरे म्हणाले की, करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाला सामाजिक संस्थांची होत असलेली मदत महत्त्वपूर्ण आहे. अँटीबॉडी तपासणी अभियान राबवून नागरिकांमध्ये जागृती करण्याचे मोठे काम करण्यात आले आहे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास आपण लवकरच नगर शहर करोनामुक्त करू शकतो.
राजेंद्र बोथरा म्हणाले की, अनेकांना करोना होवून गेला तरी त्याची लक्षणे जाणवली नसतील. अशा सर्वांसाठीच अँटीबॉडी तपासणी महत्त्वाची आहे. या तपासणीतून करोना होवून गेला की नाही हे समजते. तसेच एखाद्याच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्या असतील तर ती व्यक्ती प्लाझमा दानही करू शकते. तसेच अँटीबॉडी तयार झालेल्या नसल्यास तातडीने लसीकरण केल्यास करोना प्रतिबंध अँटीबॉडी तयार होण्यास मदतही होते.
धनेश कोठारी यांनी सांगितले की, करोना काळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. या काळात प्रत्येकाने कर्तव्यभावनेने समाजासाठी योगदान देणे आवश्यक आहे. अँटीबॉडी तपासणी अभियानातून नगर शहरातील हर्ड इम्युनिटीची माहिती मिळेल. अतिशय नाममात्र दरात ही तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अभियानासाठी राजेंद्र बोथरा, राजू शेटिया यांनी इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमासाठी सकल राजस्थानी युवा मंच, बडीसाजन ओसवाल युवक संघ, माहेश्वरी युवा संगठन, जय आनंद महावीर युवक मंडळ, सी.ए.असोसिएशन अहमदनगर, अहमदनगर होलसेल जॉगरी असोसिएशन, जिनगर युवा मंच, वर्धमान युवक मंडळ, श्री महावीर प्रतिष्ठान, श्री रामदेव भक्त मंडळ ट्रस्ट आदी संस्थांनी योगदान दिले.

No comments:

Post a Comment