मागासवर्गीय कर्मचार्‍यांना वंचित ठेवणारा तो शासन निर्णय रद्द करावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

मागासवर्गीय कर्मचार्‍यांना वंचित ठेवणारा तो शासन निर्णय रद्द करावा

 मागासवर्गीय कर्मचार्‍यांना वंचित ठेवणारा तो शासन निर्णय रद्द करावा

चर्मकार विकास संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रोश निवेदन

अहमदनगर- पदोन्नतीतील आरक्षणापासून मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना वंचित ठेवणारा दि.7 मे रोजीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी चर्मकार विकास संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश निवेदन देण्यात आले. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सचिव सुभाष चिंधे, संतोष कानडे, बलराज गायकवाड, निलेश आंबेडकर, अशोक आंबेडकर, अमोल डोळस, संदीप डोळस, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.
पदोन्नतीतील आरक्षणापासून मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांना 7 मे च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीतील आरक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. या निर्णया विरोधात एकत्र आलेल्या सर्व मागासवर्गीय संघटनांच्या आरक्षण हक्क कृती समितीच्या अवाहनाला प्रतिसाद देत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रोश निवेदन देण्यात आले. जो पर्यंत मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण सुरु होत नाही, तो पर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे. या निर्णयाने मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला असून, आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने आरक्षणाचा लढा अधिक तीव्र केला जाणार असल्याची माहिती चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here