स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले तरच गावे आरोग्य संपन्न व समृद्ध होतील : खाजगीवाले - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 29, 2021

स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले तरच गावे आरोग्य संपन्न व समृद्ध होतील : खाजगीवाले

 स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले तरच गावे आरोग्य संपन्न व समृद्ध होतील : खाजगीवाले

रोटरी सेंट्रलच्यावतीने सारोळा बद्दी येथे बंधारे खोलीकरण व रूंदीकरणाचे कामाचा शुभारंभ


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः करोना काळात आरोग्य विषयक गोष्टींना प्राधान्य देणं गरजेचं असले तरी ग्रामीण भागातील पाण्याची समस्याही तितकीच ज्वलंत आहे. करोना महामारी आज ना उद्या संपुष्टात येईल पण  दर दोन-तीन वर्षांनी येणारा दुष्काळ जगणे अवघड करतो. यावर शाश्वत उपाय शोधणं गरजेचं आहे. यासाठीच पावसाळ्यापूर्वी
 बंधारे खोलीकरण व रूंदीकरण अत्यावश्यक आहे. यासाठी रोटरी सेंट्रलने पुढाकार घेऊन प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. स्वच्छ व मुबलक पाणी मिळाले तरच गावे आरोग्य संपन्न व समृद्ध होतील असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलमार्फत नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथील बंधार्‍याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या शुभारंभ प्रसंगी  खाजगीवाले बोलत होते. यावेळी रोटरी सेंट्रलचे सेक्रेटरी ईश्वर बोरा, प्रोजेक्ट चेअरमन राजीव गुजर, श्रीकांत खाजगीवाले, एस.व्ही.जोशी, डॉ. दिलीप बागल, धिरज मुनोत, अजय गांधी, सागर पंजाबी, आशिष कुमार, विजय जुंदरे, गणेश शहा, उमेश रेखे, सोहन बरमेचा, प्रशांत बोगावत, सरपंच सचिन लांडगे, कॅप्टन बन्सी डाके, माजी सरपंच भीमराज लांडगे, बाबासाहेब डाके, प्रमोद बोरूडे आदी उपस्थित होते.
ईश्वर बोरा यांनी सांगितले की, सारोळा बद्दी गावामध्ये दरवर्षी फेब्रुवारी पासून पाणी टंचाई असते. ग्रामस्थांनी गावातील  पिण्याचे पाण्याचे प्रश्न आणि त्याबाबतची व्यथा रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल कडे व्यक्त केली.  सुमारे 2 हजार लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात छोटे मोठे 8 ते 10 बंधारे आहेत.  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने बंधार्‍यांचे खोलीकरण आणि बंधार्‍यांचे रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे ही बाब सरपंच व त्यांच्या सहकार्‍यांनी लक्षात आणून दिली.   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरचे काम हाती घेताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं. तरीदेखील रोटरी क्लब अहमदनगर सेंट्रल परिवाराने  ग्रामपंचयतीच्या  माध्यमातून आणि गावकर्‍यांच्या सहकार्यातून हे काम पूर्णत्वाकडे नेण्याचा निर्धार केला. याठिकाणी  210 कॅपॅसिटीच्या पोकलॅन्ड आणि जेसीबीच्या साह्याने कामाचा शुभारंभ केलेला आहे.  8000 घन मीटर खोदकाम करुन याठिकाणी पाण्याचा साठा वाढवण्यात येणार आहे.
 सरपंच सचिन लांडगे म्हणाले की, सध्या करोना महामारीचे थैमान सुरू असले तरी गावांना भेडसावणारे अन्य मूलभूत प्रश्नांची सोडवणूकही महत्त्वाची आहे बंधारे खोलीकरण व रूंदीकरणासाठी रोटरी सेंट्रलने घेतलेला पुढाकार अतिशय कौतुकास्पद आहे. या कामामुळे गावाचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल असा विश्वास आहे.
प्रोजेक्ट चेअरमन राजीव गुजर यांनी सांगितले की,  पाणी हा गावकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तो सोडवण्यासाठी रोटरीने संकल्प करून 190 तासाचा आराखडा तयार केला आहे. हे काम वेगाने पूर्ण करून जून महिन्याच्या अखेर पहिल्या एक दोन पावसातच  रुंदीकरण व खोलीकरण झालेले  बंधारे तुडुंब भरलेले दिसतील. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here