ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनचा जिल्हाध्यक्षपदी शेख जुनेद अहमद यांची निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनचा जिल्हाध्यक्षपदी शेख जुनेद अहमद यांची निवड

 ऑल इंडिया  कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनचा जिल्हाध्यक्षपदी शेख जुनेद अहमद यांची निवडनगरी दवंडी

अहमदनगर - नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या अकरा वर्षापासून सरकारी ठेकेदार म्हणून काम करणारे व अभियंत्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असणारे इंजिनीयर शेख जुनेद अहमद खलील अहमद यांची ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्टर वेल्फेअर असोसिएशन च्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश पेशावरे यांनी शेख यांना दिले.

शेख जुनेद अहमद खलील अहमद हे अभियंता तसेच सरकारी ठेकेदार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. इंजिनीयर यांच्या हक्कासाठी लढा देत असतात शासन निर्णयानुसार कामकाज राबविण्यासाठी ते  प्रयत्नशील असतात. तसेच कार्यालयीन समस्या साइटवर काही अडचणी असतील ते सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत यांची ऑल इंडिया कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच जिल्हा तालुका तसेच शहर कार्यकारिणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment