शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे गरजेचे ः जरीवाला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे गरजेचे ः जरीवाला

 शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे गरजेचे ः जरीवाला

अहमदनगर युवा फौंडेशनच्यावतीने स्थापना दिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
आज अनेक शहरांची स्थापना कधी झाली, कोणी वसवले हे माहित नाही, परंतु अहमदनगर शहराची स्थापना कधी व कोणी केली याची इतिहासात नोंद असल्याने गेल्या 500 पेक्षा जास्त वर्षाच्या अहमदनगर शहराचा स्थापना दिवस साजरा होतो ही ऐतिहासिक बाब आहे. त्या काळी अहमदनगर शहराची गणना जगातील मोजक्याच शहराबरोबर करण्यात येत असत. इतके वैभवशाली असे अहमदनगर होते. काळाच्या ओघात अनेक स्थित्यांतरे पाहिलेल्या अहमदनगर शहरातील सर्व इतिहासिक वास्तूंचे जतन करणे गरजेचे आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीला माहिती होण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाची गरज आहे. त्यासाठी आम्ही पुरातन विभागाशी संपर्क करून या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न करु. तसेच अहमदनगर शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर जाणारा रस्ता करण्यासाठीही पाठपुरावा करू, असे प्रतिपादन अहमदनगर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी केले.
अहमदनगर शहराच्या 531 वा स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजाम शाह याांच्या कबरीवर अहमदनगर युवा फाउंडेशनच्या वतीने चादर अर्पण करून दुआ करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाई जहागिरदार, अहमदनगर काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे शहर अध्यक्ष अज्जूभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते रशीदभाई खान, अहमदनगर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अलतमश जरीवाला, अ‍ॅड.अशरफ शेख, टिपू सुलतान सेनेचे अध्यक्ष सय्यद शाहफैसल, आर्कि. फिरोज शेख, सीए अमित डोंगरे, जनार्धन मुत्याल, रोहित अंदे, इतिहास पुरातन विभागचे जगदीश माळी, सतीश भुसारी, रेहान व नबिहा फ़िरोज़ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना अलतमश जरीवाला म्हणाले की अहमदनगर शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. त्या काळी या शहराची इतकी भरराट झाली होती की व्यापार, कला, राजेशाहीची चर्चा संपुर्ण जगभर होत. एक आधुनिक व वैभवशाली शहर म्हणून ओळख होती. शहराचा इतिहास सुरुवातीपासूनच रोमांचकारी राहिलेला आहे. अनेक देशी-विदेशी इतिहासकारांनी अहमदनगर शहराचे वर्णन आपल्या ग्रंथात केले आहे. अशा शहराचा आपण अभिमान बाळगला पाहिजे व ऐतिहासिक ठेवा असलेल्या या वास्तूंचे जतन केले पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी जगदीश माळी, राजूभाई जहागिरदार, अज्जूभाई शेख, सय्यद शाहफैसल आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्तविकात अ‍ॅड.अशरफ शेख यांनी शहराची स्थापना व इतिहासातील महत्वांच्या घटना सांगितले. राजूभाई जहागिरदार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here