आ. रोहित पवार यांच्या हस्ते तहसीलदारांकडे ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ सुपूर्द. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 22, 2021

आ. रोहित पवार यांच्या हस्ते तहसीलदारांकडे ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ सुपूर्द.

 आ. रोहित पवार यांच्या हस्ते तहसीलदारांकडे ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ सुपूर्द.नगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

जामखेड -को रोनाच्या वैश्विक संकटात अहोरात्र आपले कर्तव्य बजावणा-या अत्यावश्यक सेवेतील कोरोना योध्द्यांकरिता बारामती अॅग्रोचे सीईओ व आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती अॅग्रोतर्फे ‘उर्जा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोनाच्या या दुस-या लाटेच्या कालावधीत पार पडलेल्या थोर व्यक्तीमत्वांच्या जयंतीनिमित्त स्मरण म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत बारामती अॅग्रोतर्फे सामाजिकी बांधिलकीतून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल यासारख्या प्रशासनात कार्यरत कोरोना योध्द्यांसाठी ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ देण्यात आले. आज शनिवारी कोव्हीड सेंटर येथे हे ओआरएस एनर्जी ड्रिंक आ. रोहित पवार यांच्या हस्ते तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.


कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नाविण्यपूर्ण उपाययोजना आ. रोहित पवार आपल्या जामखेड मतदारसंघात राबवत आहेत. केवळ आपल्या जामखेड मतदारसंघापुरतेच मर्यादित न राहता राज्यस्तरावरही आ. रोहित पवार विविध प्रयत्न करत आहेत. दरम्यान एकीकडे रुग्णसेवेसाठी कार्यरत असतानाच कोरोना विरुध्दच्या या लढाईत अहोरात्र आपले कर्तव्य बजावून समाजाच्या संरक्षणाची ढाल होत कार्य करणा-या कोरोना योध्द्यांसाठी देखील आ. रोहित पवार यांच्यातर्फे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ‘उर्जा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 

कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतरच्या या कालावधीत, माता रमाबाई आंबेडकर, संत सेवालाल, छ. शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, सुभेदार मल्हारराव होळकर, शहाजीराजे भोसले, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महाराणा प्रताप, छ. संभाजी महाराज यांच्या जयंती पार पडल्या.  तर येत्या काही दिवसात असणारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती होय. या थोर व्यक्तीमत्वांनी समाजासाठी कार्य करून राष्ट्रशक्तीची ज्योत माणसामाणसांमध्ये लावली, एक आदर्शवत ‘ऊर्जा’ आपल्या प्रत्येकामध्ये या थोर व्यक्तीमत्वांनी निर्माण केली. या महान व्यक्तीमत्वांचे स्मरण म्हणून ‘ऊर्जा’  हा उपक्रम आ. रोहित पवार यांच्या ‘बारामती अॅग्रो’तर्फे राबवण्यात येत आहे. 

आरोग्यविषयक काळजी व सद्भावनेतूनच बारामती अॅग्रोतर्फे सामाजिक बांधिलकीतून ‘उर्जा’ उपक्रमांतर्गत जामखेड तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल यासारख्या प्रशासनात कार्यरत कोरोना योध्द्यांसाठी ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ देण्यात आले. काही दिवसांवरच पावसाळा सुरु होत असून या वातावरणीय बदलामुळे रोगराईची साथ पसरते तेव्हा अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती सुदृढ राहावी, यासाठी हे ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ या कोव्हीड योध्द्यांसाठी देण्यात आले. 


बारामती अॅग्रोचे सीईओ व कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी आज शनिवारी जामखेड तालुक्याचे तहसीलदार व आपत्कालीन परिस्थितीतील इंसीडेंट कमांडर विशाल नाईकवाडे  यांच्याकडे या ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ सुपूर्द केल्या.   यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, नगरपरिषद मुख्याधिकारी मीनीनाथ दंडवते, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, आरोळे रुग्णालयाचे डॉ. रवी आरोळे, तालुका वैद्यकीय अधिक्षक संजय वाघ, महावितरण उपविभागीय अभियंता योगेश कासलीवर यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.         

अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. तेव्हा त्यांच्याप्रती असणा-या आरोग्यविषयक काळजी व सद्भावनेतूनच बारामती अॅग्रोतर्फे ‘उर्जा’ उपक्रमांतर्गत कोरोना योध्द्यांसाठी ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ टेट्रापॅक देण्यात आले. या योध्द्यांना शरिरातील डीहायड्रेशन रोखण्यासाठी ओआरएस हे परिणामकारक ठरणार असून यामुळे ख-या अर्थाने बारामती अॅग्रोतर्फे “ऊर्जा” देण्याचा उद्देश साध्य होईल. थोर व्यक्तींची जयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो. परंतु सद्या कोरोनाचा काळ असल्यामुळे नेहमीप्रमाणे जयंती उत्सव आपल्याला साजरी करता येत नाही. या महान व्यक्तीमत्वांनी सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा विचार दिला.  याच दृष्टीकोनातून कोव्हीड योध्द्यांप्रती कृतज्ञता म्हणून “ऊर्जा” हा उपक्रम राबवत आहोत.

No comments:

Post a Comment